शरणपूर वृद्धाश्रमात उस्थर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज,२२ जुलै रोजी सर्व आश्रमवासीयांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी पथकात डॉ ज्ञानेश्वर काळे, डॉ. शर्मिला चौधरी, सिस्टर शकुंतला जाधव, वैद्यकीय समुपदेशक श्री राजेंद्र पावले, आशाताई आदींचा समावेश होता. समाज माध्यमातून या वृद्धाश्रमाची माहिती या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पोहोचली होती. त्यातून त्यांनी स्वतःहुन ही आरोग्य तपासणी केली, हे विशेष होय.
आतापर्यंतची मदत
पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री सुभाष भिकचंद चुत्तर यांनी नुकतीच ६ कॉट आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वृद्धाश्रमास २१ हजार रुपयांची देणगी दिली आहे.
ठाण्याचे संवेदनशील पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर १० हजार०१ रुपये,श्री संदीप शिंदे , ठाणे २७०० रुपये (याशिवाय ते दरमहा १५०० रुपये मदत करणार आहेत),श्री सुभाष देसाई २१०० रुपये , श्री अरविंद जक्कल, मुंबई १००१ रुपये, श्रीमती आशाताई कुलकर्णी, मुंबई ५ हजार रुपये, श्री आर व्ही वाणी सर , नाशिक ५०० रुपये, श्री उदय तंटक , अमेरिका ५ हजार रुपये, श्री किरण कुलकर्णी, निवृत्त वरिष्ठ दूरदर्शन अभियंता, डोंबिवली २१०० रुपये, सौ त्रिवेणी राजेंद्र निकम,नाशिक ५ हजार १ रुपये, श्री राजेंद्र रघुनाथ खांडपेकर ३ हजार रुपये, डॉ आशिष शिरूरकर, नवी मुंबई ११०० रुपये, श्री प्रदीप क्षीरसागर सर,औरंगाबाद १ हजार रुपये, श्री अभय पाटील, पुणे १ हजार रुपये, सौ मंजुषा राजेंद्र शिंदे,नेवासा २७०० रुपये , आस्था फौंडेशन,औरंगाबादचे श्री गिरीश हंसराज ३ हजार रुपये, डॉ. नरेंद्र वैद्य, औरंगाबाद २ हजार रुपये, श्री कालिका कन्स्ट्रक्शन, पुणेचे श्री रवींद्र लाळे २१०० रुपये, श्री रवींद्र मनकीकर सर,औरंगाबाद १५०० रुपये, मलेशियातील श्री प्रशांत टांकसाळे ५ हजार रुपये, जळगाव येथील श्री पी बी पाटील २१०० रुपये, नवी मुंबई येथील रचना ठाकरे २००१ रुपये , नाशिक येथील सौ सोनल नितीन कदम ५०० रुपये, युको बँक,मुंबईचे अधिकारी श्री गोपीनाथ तुळसनकर, ५ हजार रुपये, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, मुंबई, ५ हजार रुपये, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,मुंबई, २७०० रुपये ,युको बॅंकेचे निवृत्त सहायक सर व्यवस्थापक श्री वामनराव सातनूरकर, नागपूर २५०० रुपये, सौ आशाताई अशोकराव कुंदप, सातारा, १५०० ( त्यांच्या आई श्रीमती सुभद्राबाई शंकरराव इंदापुरे यांच्या स्मरणार्थ ) श्रीमती मोहिनी सुभाष तंटक,सातारा १५००, लेखिका रश्मी हेडे २ हजार रुपये , निवृत्त एस टी अधिकारी श्री लक्ष्मीकांत विभूते, नवी मुंबई, १ हजार रुपये , पत्रकार सविता कोल्हे,नाशिक ५००/- रुपये या प्रमाणे मदत केली आहे.
या सर्व दान शुरांनी मदत करून या वृद्धाश्रमास नव संजीवनी मिळवून दिली, याबद्दल वृद्धाश्रमान सर्वांचे आभार मानले आहेत. निवासी वृद्धांकडून एकही पैसा न घेता पूर्णपणे सेवाभावी वृत्तीने चालविण्यात येणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील या शरणपूर वृध्दाश्रमात १६ वृद्ध व ४ कर्मचारी असे २० जण आहेत. कोरोनामुळे सध्या लॉक डॉउन सुरू आहे. त्याचा परिणाम वृद्धाश्रमावर होऊन त्यांची किराणा मालाची व अन्न धान्याची अतिशय अडचण निर्माण झाली होती , त्यामुळे या वृद्धाश्रमास मदत करावी , असे आवाहन करण्यात आले होते . या आवाहनाला प्रतिसाद म्हणून या सर्व दान शुरांनी मदत केली आहे. श्री रावसाहेब मगर , त्यांच्या पत्नी व सहकारी येथील वृद्धांची अतिशय आत्मीयतेने देखभाल करत असतात. आपण आपली यथाशक्ती मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता. अक्षय ग्रामीण युवा व क्रिडा व सामाजिक विकास संस्था, मक्तापूर,ता- नेवासा, जिल्हा-अहमदनगर, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-नेवासा, खाते क्रमांक:60070064850.IFSC code- MAHB0000147. मदतीनंतर कृपया आपले नाव,पत्ता, मोबाईल क्रमांक अवश्य कळवावा, जेणेकरून आपणास पावती पाठविणे शक्य होईल. श्री रावसाहेब मगर यांचा मोबाईल क्रमांक :7775015063. – देवेंद्र भुजबळ :9869484800.
शरणपूर वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -