Monday, September 1, 2025
Homeलेखश्रीकृष्ण जीवन दर्शन !

श्रीकृष्ण जीवन दर्शन !

आपल्या आवडत्या दैवताच्या, म्हणजेच भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त माझे विचार मांडत आहे. तत्पूर्वी, आपणा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.

भारत हा जगातील सर्वात प्राचीन आणि महान देश आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि मूल्ये ही अतिशय समृद्ध आहेत. जगात “विविधतेत एकता” या विचारासाठी भारत ओळखला जातो. येथे अनेक भाषा, धर्म, जाती, प्रांत असूनही सर्व लोक आपापसांत सलोख्याने राहतात.

भारत देशात सर्व जाती धर्मातील सण, उत्सव एकत्रित साजरा केले जातात, त्यामुळे सामाजिक सलोखा तयार होऊन आनंद आणि उत्साह निर्माण होतो, हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवत पुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार हे ‘दशावतार’ स्वरूपात प्रसिद्ध आहेत. कृष्णावतार श्री विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. आपण सर्वजण हा श्लोक नक्कीच ऐकला असेल, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात,
“यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥”
हे अर्जुना (हे भारता), जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्माचा वाद होतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. सज्जनांच्या रक्षणासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी तसेच पुन्हा धर्मसंस्था पिण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो.

याच वचनानुसार, सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी, दुष्ट कंसाचा अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी श्रीकृष्णाच्या रूपात अवतार घेतला.

श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेच्या तुरुंगात झाला. त्यांचे वडील वासुदेव आणि आई देवकी. त्यांच्या जन्माच्या वेळी सारे पहारेकरी झोपी गेले, तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडले आणि वासुदेवांनी बाळकृष्णाला एका टोपलीत ठेवून उधाण आलेल्या यमुना नदीतून पलीकडे गोकुळात नंद-यशोदेकडे पोहोचवले. हा प्रसंग म्हणजे चमत्काराची आणि देवाच्या शक्तीची अद्भुत गाथा आहे. श्रीकृष्णाचे बालपण गोकुळात गेले. ते एक खोडकर बालक होते, म्हणून त्यांना ‘नटखट कान्हा’ म्हटले जायचे. त्यांचे माखन चोरणे, गोप-गोपींसोबत रासलीला करणे आणि कालिया नागाचा पराभव करणे यांसारख्या अनेक बाललीला प्रसिद्ध आहेत. या लीलांमधून त्यांनी प्रेम, आनंद आणि शौर्याचा संदेश दिला.

पण श्रीकृष्णाचे महत्त्व केवळ त्यांच्या बाललीलांपुरते मर्यादित नाही. ते एक महान तत्वज्ञ आणि मार्गदर्शक होते. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर, जेव्हा अर्जुन गोंधळून गेला होता, तेव्हा श्रीकृष्णाने त्याला ‘श्रीमद्भगवद्गीते’चा महान उपदेश दिला. त्यांनी अर्जुनाला सांगितले, “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन”, म्हणजेच, “फळाची अपेक्षा न करता केवळ आपले कर्म करत राहा.” हा संदेश आजही आपल्या सर्वांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे.

आज आपण जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. उपवास ठेवतो, मंदिरात जातो आणि विशेषतः महाराष्ट्रात ‘दहीहंडी’चा थरारक खेळ खेळला जातो. दहीहंडी हे केवळ मनोरंजन नाही, तर ते संघटन, जिद्द आणि ध्येय गाठण्याची शिकवण देते.

मित्रांनो, जन्माष्टमीचा सण आपल्याला श्रीकृष्णाच्या जीवनातील आदर्श आपल्या आयुष्यात आणण्याची प्रेरणा देतो. चला तर मग, आपण सर्वजण त्यांच्या शिकवणीप्रमाणे सत्याच्या आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करू या.
धन्यवाद !

— लेखन : प्रभाकर कासार. तांत्रिक अधिकारी वर्ग अ, जीएमआरटी, एनसीआरए-टीआयएफआर, भारत सरकारचे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. बालकृष्ण लीला…
    लहानपणी बाललीला ऐकत झोपताना एक खोडकर व चेष्टेने सर्वांची फजिती करणाऱ्या श्रीकृष्णाने तसे का केले असावे याचा विचार केला नव्हता.
    मथुरेच्या आसपास गावातील गवळ्यांचा व्यवसाय करणाऱ्या यादवांच्या कुटुंबात वाढलेल्या श्रीकृष्णाने गाईंच्या दुधाचे पदार्थ बनवले जाताना पाहिले. त्यांची विक्री करून एका सधन कुटुंबातील मानाच्या आईवडिलांसमावेत ते राहात होते. गाईचरायला नेताना इतरांच्या गाई व गोपालकांच्या सहवासात त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती, अल्प दुध उत्पादन यामुळे आपल्या मुलाबाळांना दूध प्यायला न देता बाजारात विकून पैसे मिळवण्यासाठी घरच्या बालकांची उपासमार होत होती. अशा कुटुंबातील वरिष्ठांना धाक बसेल असे करणे आवश्यक होते. शिवाय ज्यांच्या कडे भरपूर गोरस बनत असताना घरातील बच्चे कंपनीला डोळे वटारून नाही असे म्हणत उपाशी ठेवणार्‍यांच्या घरातील विक्रीसाठी टांगलेले दुग्धजन्य पदार्थ रात्री मित्रांना बरोबर घेऊन, सांडलवंडकरून, तिथेच खाऊन पिऊन पळून जाताना सराटे पायात बोचला टाकून जे कार्य केले त्यात असा संदेश होता की घरच्या लोकांना उपाशी ठेवून विक्री व्यवसाय करणे योग्य नाही. आधी आपले सर्वांचे हित पहा म्हणजे समाधानाने जगता येईल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments