कौलारु खोपी, भकास रान
तुझ्या येण्याकडं लागलं ध्यान !!
हताश पॉर, भूकेचा काळ
गवसी तुला रं चुलीचा जाळ !!
घशात ओतल, घोटभर पाणी
तुझी हुरहुर, माझ्या रं मनी !!
वाट बघूनश्यान, थकला जीव
कवा येईल धन्याला कीव !!
रातला डोळा, लागला न्हाई
इपरित आसं, घडलया काई !!
कोवळ ऊन, पेटून ऊठलं
पाय शेताकडं, धावत सुटलं !!
कोरड्या दुष्काळानं, अखेर घेरलं
धन्यान जीव, झाडाला टांगल !!
दुष्काळ, कर्जान, सार खपलं
बळीराजाचं सपान, धुळीत माखलं !!

– रचना : सुरेखा गावंडे
सुरेखा..काय कविता केलीस,दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं चित्र
अगदी डोळ्यासमोर आलं…सही..तुझी प्रतिभा..
Good evening sir
नकळतपणे डोळे पाणावले कविता वाचुन
मी खेडेगावात राहुन डोळसपणे आजुबाजुला बघतो आणि सत्य परिस्थिती अनुभवतो नेहमीच
नकळतपणे डोळे पाणावले कविता वाचुन
मी खेडेगावात राहुन डोळसपणे आजुबाजुला बघतो आणि सत्य परिस्थिती अनुभवतो नेहमीच