नवरा बायको नावाडी
जीवन नाव चालवतात
नखं बोटं हलवून ती
लक्ष्मीला बोलवतात
नवरा बायको चाके
दोघे जीवनाच्या रथाचे
संकटे खाच खळगे
वंगण रक्ताचे अन घामाचे
नवरा बायको दिपस्तंभ
जीवनाच्या जहाजाचे
कड्याकपारी नदी नाल्यात
वाटा काढीत पुढे सरकायचे
नवरा बायको सूर ताल
जीवनाच्या गाण्याचे
नाही मिळाली साथ साऱ्यांची
तरीही गुणगुणत राहायचे
नवरा बायको ध्रुवतारा
संगती अथांग आकाश नेहमी
जरी असंख्य तारे सभोवती
टिकून साथ दोघांची जन्मोजन्मी

– रचना : सर्जेराव पाटील.
ऑस्ट्रेलिया (कौलवकर- नाशिककर)
वाह उस्ताद क्या बात है
नवरा-बायकोच्या नात्यांचे, त्यांच्या सहजीवनाचे सुरेख, वास्तववादी वर्णन. सर्जेराव पाटील, कविता छान आहे. 👏👏