Wednesday, December 3, 2025
Homeबातम्यासानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा

सानपाडा : अनुकरणीय आनंद मेळावा

नवी मुंबई येथील सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिन्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ५१ ज्येष्ठ नागरिक सभासदांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरे करण्यात आले.

यावेळच्या आनंद मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसार माध्यमातील राष्ट्रीय स्तरावरच्या रापा पुरस्कार विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय न्यूज स्टोरी टुडे पोर्टलच्या निर्मात्या सौ. अलका भुजबळ यांचा तसेच संघाचे जेष्ठ सदस्य श्री उत्तम चव्हाण यांच्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या सौ अश्विनी संदेश मोरे आणि श्री लक्ष्मीकांत कोळपकर यांचा

तसेच संघाचे फलक सुंदर अक्षराने लिहिणारे नारायण साखरे, वाढदिवस असणाऱ्या सभासदांना माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, समाजसेवक अविनाश जाधव, प्रियंका जाधव यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक भाषण संघाचे सचिव जगदीश एकावडे आणि शरद पाटील यांनी केले.

यावेळी संघाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री मारुती विश्वासराव यांनी भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने वाढदिवसाच्या मानकरी असणाऱ्यांचे निवेदन संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी केले. देणगीदारांची नावे संघाचे खजिनदार महादेव पाटील यांनी वाचली. तर आभार संघाच्या उपाध्यक्षा सौ. सीमा बोराडे यांनी मानले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते पत्की आणि इतर सभासदांनी वाढदिवसाचे सामूहिक गाणे गायले. शेवटी ज्येष्ठ नागरिकांना स्नॅक्स वाटप करून आनंद मेळाव्याची सांगता झाली.

या मेळाव्यास संघाचे आजी, माजी पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अभिनंदन अलका !💐
    अश्याच अनेक पुरस्काराचा वर्षाव होत राहो !
    कारण मनापासून अनेक कार्ये तू करत आहेस. नवनवीन कल्पना तू साकार करत आहेस. सतत विविध प्रगतियुक्त कल्पनांनी भारलेला तुझा मेंदू जणू संगणक आहे.
    पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments