जगात कोरोनाच्या गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या कहरामुळे आपण सारे घरकोंडीमध्ये अडकलो.
लॉकडाऊनमुळे सुरवातीचे काही दिवस औत्सुक्याचे, सोबत कंटाळवाणे, त्रासदायक गेले. सर्वांचीच मती गुंग झाल्यासारखी अवस्था झाली होती. अशा परिस्थितीत लोकांना काही दिलासा हवा होता.
या पार्श्वभूमीवर विनोदी लेखक श्री नागेश शेवाळकर यांच्या काही मित्रांनी त्यांना कोरोनासंदर्भात विनोदी कथा लिहायला सुचविले. त्यांच्याही ते डोक्यात होतेच.
साधारण मे २०२० ते एप्रिल २०२१ या एका वर्षाच्या कालावधीत शेवाळकर सरांच्या लेखनीतून कोरोना डोळ्यासमोर ठेवून २५ विनोदी कथा, ८ बालकथा, ३ लेख, १ विठूमाऊलीचे व १ बालकांना पत्र अशी साहित्य निर्मिती झाली. या लेखनास वाचकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला.
बारा विनोदी कथांचा पहिला संग्रह “लॉकडाऊन वाहिनी” हा इसाप प्रकाशन, नांदेड यांच्यावतीने लवकरच प्रकाशित होत आहे.
सध्या ई पुस्तकांनाही भरपूर वाचक आहेत हे लक्षात घेऊन नऊ विनोदी कथांचा संग्रह “कोरोना निवास” आणि सात बालकथांचा “माझी शाळा कोरोना शाळा” हे दोन ई कथासंग्रह शॉपिज़ेन या ई साहित्य प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित झाले आहेत.
हे दोन्ही संग्रह पुस्तकाच्या स्वरुपातही लवकरच प्रकाशित होत आहेत ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. यातील काही कथा या २०२० च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या आहेत. ही तिन्ही पुस्तकं लवकरच वाचकांच्या भेटीला येतील अशी आशा आहे. तो पर्यंत प्रतिक्षा करू या!
– देवेंद्र भुजबळ. 9869484800.
व्वा भले बहादूर
आज याही सकारात्मकता वाढविणार्या डोसेसची गरज आहेच..