अमरावती येथील सौ ज्योत्स्ना प्रकाश शेटे यांनी सामाजिक कार्यात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करून एक आदर्श निर्माण केला आहे.
ज्योत्स्नाताईंनी आतापर्यंत प्लास्टिक निर्मूलन अभियान, व्यसनमुक्ती अभियान, बेटी बचाव – बेटी पढाव अभियान, वृक्षारोपण, योग शिबिर, अमरावती मध्यवर्ती कारागृह, शासकीय मुलामुलींचे निरीक्षण गृह व इतर ठिकाणी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
ज्योत्स्नाताईंनी, महिलांच्या सुप्त गुणांचा विकास व्हावा याकरिता जागतिक महिला दिन, मी एक रुपवती, हळदी कुंकू, चित्रकला, रंगोली स्पर्धा, गायन स्पर्धा, सांस्क्रुतिक कार्यक्रम, महिला मेळावे यांचा उल्लेख करावा लागेल.
विशेषतः कोरोना काळात अनेक राज्यस्तरीय
ऑनलाइन उपक्रम राबविले. जसे राज्यस्तरीय विदर्भ कासार महिला आघाडी तर्फे कविता वाचन, व्हीडिओ स्पर्धा, २१ दिवशीय योग शिबिर, भजन स्पर्धा, भावगीत स्पर्धा, अमरावती, मेरी आवाज ही पहेचान है, श्रीकृष्ण भक्तीगीत, जिंदगी मिलके बितायेंगे हा हिंदी फिल्मी गीत कार्यक्रम यांचा समावेश आहे.
ज्योत्स्नाताईंनी आतापर्यंत भुषविलेली पदे म्हणजे,
अध्यक्षा – दीप ज्योती बहुउद्देशीय महिला विकास संस्था,
अध्यक्षा – विदर्भ कासार महिला आघाडी नागपूर,
अध्यक्षा – अमरावती कासार,
उपाध्यक्षा – अमरावती महिला आघाडी,
राष्ट्रीय सामाजिक संघ, महाराष्ट्र जिल्हा, समन्वयक – तंबाखू मुक्त शाळा अभियान, अमरावती,
संघटक – आविष्कार फाऊंडेशन अमरावती,
सरचिटणीस – शिक्षक समिती भातकुली,
कार्याध्यक्ष – अमरावती ग्राहक संरक्षण समिती
कोअर कमेटी सदस्या – ग्राहक संरक्षण समिती यवतमाळ,
मुख्याध्यापिका -पूर्व माध्यमिक शाळा, दाढी, ता.भातकुली, जि .अमरावती.
ही होत.
एम.ए. संगीत, एम. ए. इतिहास या उच्च पदव्युत्तर पदव्या संपादन केलेल्या ज्योत्स्नाताईंनी शास्त्रीय संगीतातल्या ५ परीक्षा, सुगम संगीतातल्या ७ परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या आहेत. गायन वादन, लेखन, शैक्षणिक व सामाजिक कार्याची त्यांना आवड आहे.
आज जरी ज्योत्स्नाताईं कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सुस्थितीत असल्या तरी त्यांचे बालपण “काट्या मधली फुले हसुनी म्हणती काय आम्हाला, दुःख आपुले उरात भरुनी वाटा सौख्य जगाला” या युक्तीनुसार सुखदुःखाच्या झोपाळ्यावर गेले. गरीब परिस्थितीमधून हे सर्व बहीणभाऊ वर आले आहेत. त्यांच्या आई वडिलांनी सर्वांच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेऊन त्यांना आपल्या पायावर उभे केले.
ज्योत्स्नाताईंची शिक्षिका म्हणून प्रथम नियुक्ती झाली तेव्हा आईवडिलांना खूप आनंद झाला. कालांतराने पदोन्नती मिळून त्या आज मुख्याध्यापिका पदावर कार्य करत आहेत. आपल्या आई बाबांचे उपकार त्या कधीही विसरू शकत नाही. आपल्याला जो मान सन्मान मिळाला व मिळतो, जी प्रगती झाली ती आईवडिलांचा आशीर्वाद व सासरच्या लोकांमुळे, पती, मुलगा, समाजातील बंधु भगिनी संस्थेच्या सर्व सदस्या, मित्र मैत्रिणी व माझे हितचिंतक मार्गदर्शक यांच्या सहकार्यानेच असे त्या कृतज्ञतेने नमूद करतात.
परंतु प्रगतीच्या वाटेने जाताना त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. आपलीच जवळची वाटणारी माणसं अडथळे आणण्याचा, पाय ओढण्याचा ही प्रयत्न करतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते. ज्यांना आपण आपलं समजतो तीच माणसे आपला राग, द्वेष करतात हे पाहून त्या व्यथित होतात, पण या बरोबरच अनेक चांगल्या लोकांशी परिचय झाला याचे त्यांना समाधान वाटते.
ज्योत्स्नाताईंचे सामाजिक व शैक्षणिक कार्य पाहून अनेक संस्थानी त्यांना पुरस्कार देवून त्यांचा गौरवही केला आहे. हे पुरस्कार असे :
1) तेजस्विनी पुरस्कार 2013
2) राष्ट्रीय क्रांतीज्योति पुरस्कार 2015.
3) राष्ट्रीय कर्तव्य सन्मान पुरस्कार 2015.
4) आदर्श समाजसेवा पुरस्कार 2015.
5) झाशीची राणी आदर्श शिक्षक पुरस्कार 2015.
6) मातोश्री सावित्रीबाई फुले जनसेवा पुरस्कार
7) ग्लौबल एक्स्लन्स अवार्ड 2017.
8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान सेवा विशेष गौरव पुरस्कार 2017
9) दादासाहेब भमोदकर महाविद्यालय येथे व्यसनमुक्ती अभियान राबविल्याबद्दल प्रबोधिनी पुरस्कार 2018.
10) वूमन अचिव्हर अवार्ड 2021.
11) अमरावती पंच मंडळ कासार तर्फे पुरस्कार.
12) गाडगेबाबा पुरस्कार
13) सलाम मुंबई फाऊंडेशन तर्फे तम्बाखूमूक्त शाळा केल्याबद्दल महाराष्ट्र रत्न सन्मान प्रमाणपत्र 2019.
या शिवाय कोविड 19 लॉक डाऊन मध्ये गरजू घटकांना मदत केल्याबद्दल अनेक संस्थानी कोरोना योद्धा प्रमाणपत्र देवून त्यांचा सन्मान केला आहे.
अशाप्रकारे विचारांची देवाणघेवाण करीत, हसत खेळत जीवनप्रवास करणाऱ्या, आपल्या परीने तनमनधननाने समाज सेवेचे व्रत हाती घेतलेल्या
ज्योत्स्नाताईं म्हणतात, “प्रत्येकाने आपले कुटुंब, समाज, जिल्हा व्यसनमुक्त ठेवावा म्हणजे सर्व सुखी समाधानी राहतील. कोणतेही कुटुंब उध्वस्त होणार नाही. समाज आनंदी राहील. समाजाने होतकरू, उद्योगी, समाज कार्य करणाऱ्या व्यक्तींना व तरुण पिढीला पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्यावी. साथ द्यावी. त्यांना डावलून त्यांचा उत्साह कमी करू नये. समाजाचा विकास तो आपला विकास हाच उद्देश सर्वांचा असावा.”
केवळ मी आणि माझे कुटुंब एव्हढाच संकुचित विचार न करता सक्षम समाज निर्माण झाला पाहिजे यासाठी सतत झटणाऱ्या ज्योत्स्नाताईंना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

– लेखन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
तुमचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे .
शिक्षक समिती मध्ये सुद्धा आपले कार्य सतत सुरु आहे .
आपली अशीच प्रगती होवो .
पुढील वाटचालीस शुभकामना
मान.देवेंद्रजी भूजबळ यांनी सुलभ व सुंदर शब्दात
लिहिलेला ज्योत्स्नाताई शेटे यांच्यावरील लेख म्हणजे
आदर्श सेवाभावी मुख्याध्यापिकेला केलेला मानाचा मुजराच आहे.ज्योत्स्नाताईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला
मनापासून सलाम.ज्योत्स्ना ताईंसारख्या समाजातील
अशा गुणवंतांना हेरून त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहचवून
मान.देवेंद्रजी भुजबळ समाजापुढे मोठा आदर्श निर्माण
करीत आहेत.देवेंद्रजींच्या या अनमोल कार्यास माझा मानाचा मुजरा.