Thursday, March 13, 2025
Homeसाहित्य'स्वप्नरंग स्वप्नीच्या' ( १९ )

‘स्वप्नरंग स्वप्नीच्या’ ( १९ )

दिल्लीच्या विमानतळावर अविनाश चक्क बाहू पसरवून उभा होता..! रोमी थोडी लाजत, इकडे तिकडे बघत त्याच्या बाहुत विसावली..!

तिने आसपास पाहिलं, तर सर्वच आपापल्या व्यक्ती भेटल्यावर मिठी, शेकहॅन्ड, जवळ घेत होते..! कोणाच कोणाकडे लक्ष न्हवत..! सर्व स्वतःमध्ये दंग..!

कित्येकदा आपल्याला वाटत, की आपल्या कडे कोणी बघत असेल, पण प्रत्यक्षात तस नसत..! ते स्वतःमध्ये च असतात..!
रोमीच्या कानात अवि बोलला, “what a relief..” आणि ती त्याला जास्तच बिलगली..!

हॉटेलवर पोचले तेव्हा अविनाश खूप खुश होता..!
रूममध्ये येताच दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली..! थोड्या वेळाने अविनाश म्हणाला, “तू फ्रेश हो, मी कॉफी करतो..! मग आवरून खाली जेवायला जाऊ या..”

रोमी फ्रेश होऊन आली.. कॉफी पिऊन आवरायला घेतलं..! पांढऱ्या, पिवळ्या फुलांच डिझाईन असलेली, निळ्या रंगाची सिल्क साडी, मॅचिंग ब्लॉउज, हातात निळ्या, पिवळ्या मिक्स बांगड्या, मोठं कुंकू आणि मोकळे केस…!
अविनाश तिच्याकडे पहात राहिला..! नजर
हटेचना..! मग पुढे होऊन “इस बात पे” अस म्हणत तिच दीर्घ चुंबन घेतलं..!
“जेवण इथेच मागवू या का ?” डोळा मारत त्याने विचारलं…!
“पटकन जेवून येऊ या..!” रोमी म्हणाली सहज..!
“पटकन…! अ..! ” अस मिश्किल पणे तो म्हणाला..! त्यावर ती लाजली…!
अविनाश तर खूप रंगात आला होता..! तिच्याकडे बघत, रोमँटिक गाणी गात, तिला फुलवत होता..! बेहोष, बेधुंद रात्र रोमीने अनुभवली..!

झा..लं..! त्याचा परिणाम सकाळी उठायला उशीर..! मग चिडचिड, राग सुरू अविनाश चा..!
तिने लक्ष न देता, भरभर आवरून दिलं..! स्वारी जाताना शांत झाली आणि हलकी पप्पी घेऊन निघाला अविनाश..!

खूप पसारा झाला होता खोलीत..! तिने आल्या वर पहिला..! तरी अविनाशची ओढ आधी जपायची होती..! आणि स्वतःचीही…!
कामात एवढा परफेक्ट असणारा माणूस, खोली मात्र पूर्ण imperfect..! कपडे अगदी व्यायले होते सगळीकडे..! टॉवेल पडलेले ओलेते, मान टाकून..! तिने सर्व आवरलं..!
बाथरूम मध्ये बाटल्या पडलेल्या, शॅम्पू, बॉडी लोशन…! अर्धी गळलेली बाजूने…!
तिने सर्व बाटल्या टिशू ने पुसून नीट लावल्या..!
सगळं करता करता एक वाजला..!

ती ब्रेकफास्ट करायला विसरली..!
अविनाश चा फोन आला…! “झाली का आवराआवर ..! भूक लागली असेल..! जेवण येईल बघ इतक्यात…!”  तेवढ्यात बेल वाजली आणि तिच्या आवडीचे छोले, भटोरे होते..!
तिने ट्रे आत घेतला..! “काल तुझी नजर सगळ्या पसाऱ्यावरून फिरत होती, ती बघून लक्षात आलं, की उद्या झपाटल्यागत तू काम करणार..!
जेव मग करतो फोन..!”
मनकवडा आहे हा…! तिला खूप भूक लागली होती..! मस्त भरपेट जेवली…!
सगळं आवरून ठेवलं..! आणि तिनेच फोन लावला..!
व्हिडीओ कॉल वर अस्ताव्यस्त केस, अवतार असून ही ती खूप सुंदर दिसत होती..! खोली आवरलेली दाखवली त्याला..!
धन्य म्हणत त्याने फोन ठेवला…! ती ही झोपली मस्त..!

संध्याकाळी अविनाश आला, तेव्हा छान तयार होऊन त्याच स्वागत केलं..! दमला होता..!
चहा, बिस्किट खाऊन जरा पडला…! त्याच डोकं हलक्या हाताने ती चेपत होती..! त्याला गाढ झोप लागली..!
त्याच्याकडे बघत असताना तिला त्यांच्या आधीच्या भेटी आठवत होत्या..!
प्रत्येक भेटीत तो नव्याने कळत गेला…! आणि आवडत ही..!
प्रेम व्यक्त करत लग्न करशील का ? हे विचारताना तर किस्साच घडला होता..!
काय होता तो ?
क्रमशः

प्रतिभा चांदूरकर

– लेखन : प्रतिभा चांदूरकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित