रोमीने शब्दांची जुळवाजुळव करत मिताली ला विचारलं..!
“मितु..! I know it’s personal..! But still would you like to share samir’ s number…!”
मितालीने तिच्याकडे बघितलं आणि लागलीच नंबर शेअर केला..!
“मला माहीत होतं तू नंबर मागणार..!”
“thanks”
त्यांच्यात एवढंच बोलणं झालं…!
समीरचा फोन आला तो एअरपोर्ट वर पोचला म्हणून..! अर्ध्या तासात दोघे ही मितालीच्या हॉटेलमध्ये पोचले…!
रोमीने तिला खाली बोलावलं..! ती कशी रिऍक्ट होईल ह्याची भीती होतीच…!
ती खाली आली आणि समोर समीर ला पाहून स्तब्ध झाली..! कस आणि काय रिऍक्ट व्हावं तिला कळेना..!
थोडा वेळ तसाच गेला, मग तीच म्हणाली, रूम वर जाऊ या..!
हुश्श..! रोमी ने निश्वास सोडला..!
रूमवर गेल्यावर सगळे शांत होते आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते…!
त्याच हॉटेलमध्ये समीर ने दुसरी रूम बुक केली होती..!
थोडया वेळाने तो त्याच्या रूमवर गेला..!
रोमीने अपराधी सुरात विचारलं, “रागावलीस का ?”
“खर सांगायचं तर थोडा वेळ रागावले होते..! आता नाही..! लक्षात आलं की रागाच्या भरात समस्या जास्त वाढतात, सुटण्या ऐवजी..”!
“तेव्हाही दोघे खूप रागात होतो…! शब्दाने शब्द वाढला, समस्या तिथेच..!
“हे बघ..! आज रात्री किंवा उद्या दोघेही शांतपणे बोला एकमेकांशी..! तू जेव्हा फोटो दाखवलास ना, तेव्हा मला समीर डिसेंट वाटला..! तुला फसवणारा नाही वाटला..! अस मनात आलं की कदाचीत थोडा confused , घाबरलेला असावा …! अचानक आलेल्या जबाबदारी मुळे..!”
“So baby, cool..! Think again..Ok bye अस म्हणत रोमी घरी यायला निघाली..!
वाटेत अर्थात अविनाश चा फोन..!
“Only two days , baby …!” उतावीळ झालेला अविनाश बोलत होता…! खरच की..! दोन दिवसांनी दिल्लीला जायच..!
इतके दिवस कसे गेले कळलं ही नाही..!
बॅग पॅक करायला हवी..! कुठले ड्रेस घेऊ ? थोडे मॉडर्न घेते, पंजाबी ड्रेस थोडे आणि एक, दोन साड्या घेतेच..! अविला मी साडी नेसलेली, बांगड्या घातलेल्या, कपाळावर मोठं कुंकू, केसात भरघोस गजरा घातलेला, अस नटलेलं फार आवडत..!
अस नटल की त्याच्या रोमान्स ला अगदी बहर येतो..!
त्या आठवणीने रोमी लाजली..! आणि त्या आठवणीत घरी पोचली..!
सकाळी सकाळी मिताली चा फोन…!
“thanks dear…! आम्ही काल शांतपणे बोललो..! सगळं सॉर्ट झालं..! एक महिन्याने परत जाऊ आणि जाताना रजिस्टर मॅरेज करून जाऊ..!
“काय ?” रोमी किंचाळली…! सासूबाई तिच्याकडे पहायला लागल्या..! सांगते अस म्हणत ती रूममध्ये गेली…!
“खूप घाबरले होते मी..! करते ते चूक की बरोबर हेच कळत न्हवत…thank god…!”
बर.. ऐक …! मी परवाच्या फ्लाइट ने दिल्लीला निघालेय..! पंधरा दिवसांनी किंवा त्याच्या आधी परत येईन..! तोवर एन्जोय करा दोघे…! समीर कुठेय..! त्याला फोन दे ना..!”
“समीर, great..! शांतपणे निर्णय घेतलास, खूप बरं वाटलं..” रोमी..!
“Thanks to Avinash ..! जबरदस्त convincing power आहे त्यांच्यामध्ये..! मी फेस करायला घाबरत होतो..! तो म्हणाला काही झालं तर मी आहे…! आल्यावर मिताली शी बोलींन..! पण आधी तू बोल..!”
“हो..! तोच त्याचा प्लस पॉईंट आणि दिलखुलास स्वभाव..! पटकन मदतीला तयार..! ” हसत रोमी म्हणाली..!
ह ..! आता अवि भेटला की सगळी वसुली..! हवीहवीशी..! रोमी लाजत, हसत होती त्याच्या आठवणीने..!
अनिवार ओढ दाटली होती मनात..!
क्रमशः

– लेखन : प्रतिभा चांदूरकर.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800
स्वप्नरंग स्वप्नीच्या. औत्सुक्य वाढविणारी कथा