Monday, January 26, 2026
Homeसाहित्यहसत हसत लेखणी येते….

हसत हसत लेखणी येते….

हसत हसत लेखणी येते
रोज कवीच्या हातात
दोन शब्द लिही म्हणते
रोज वहीच्या पानात

भाषा तिची समजत नाही
मुके बोल न येई कानात
तरीही कवी व्यक्त होत असतो
दोन शब्द वहीच्या पानात

सुंदर लेखणी शोभून दिसते
रोज कवीच्या हातात
पाहून रूप लेखणीचे
शब्द उतरती विचारात

विचारांना मिळताच दिशा
वळण घेती मनात
म्हणती व्यक्त हो व्यक्त हो
दोन शब्द लेखणीच्या सहवासात

दोन दोन शब्द लिहीता लिहीता
कविता येते वयात
सुंदर काव्य बघून लेखणी
हळूच हसते गालात

हसत हसत लेखणी रमवते
कविला कवितेच्या नादात
दोन शब्द लिही म्हणते
रोज वहीच्या पानात

— कवी : चंद्रशेखर कासार. धुळे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments