Thursday, September 19, 2024
Homeबातम्याहुंडाविरोधी चळवळीतर्फे निबंध स्पर्धा : आकर्षक बक्षिसे

हुंडाविरोधी चळवळीतर्फे निबंध स्पर्धा : आकर्षक बक्षिसे

हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या ४७व्या वर्धापनदिनानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रौढांसाठी (१८ वर्षावरील व्यक्ती) खुली निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विषय आहेत : (१) एकविसाव्या शतकातील हुंडा प्रथा आणि तरुणाई. (२) आजची महिला सुरक्षा : भ्रम आणि तथ्य. निबंधाची कमाल शब्दमर्यादा १२०० शब्द असून निबंध फक्त मराठी भाषेत लिहिता येईल. निबंध फुलस्केप अथवा ए ४ आकाराच्या आखलेल्या कागदावर एकाच बाजूने सुवाच्च अक्षरात लिखित अथवा टंकलिखित असावा. निबंधाची मूळ प्रत पाठवावी, फोटोप्रत स्वीकारली जाणार नाही.

स्पर्धकाने निबंधाला जोडून स्वतःच्या स्वाक्षरीसह स्वतःचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता (पिनकोडसह) वय, व्यवसाय, टेलिफोन नंबर व ईमेल पाठवावा. निबंध ईमेलवर स्वीकारला जाणार नाही. “सदर निबंध यापूर्वी कुठल्याही निबंध स्पर्धेत बक्षिसपात्र ठरलेला नसून निबंध मी स्वतः लिहिलेला आहे “असे प्रमाणपत्र लेखकाच्या स्वाक्षरीसह निबंधाच्या शेवटी देणे अनिवार्य आहे.

बक्षिसे : पहिल्या तीन क्रमांकांच्या विजयी स्पर्धकांना रोख रू.१५००/-,रु.१०००/-आणि रु.५००/-, अशी तीन पारितोषिके आणि पहिल्या दहा क्रमांकांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील. सर्वोत्कृष्ठ निबंधास जगन्नाथ परळकर ट्रॉफी दिली जाईल . स्पर्धेसाठी परीक्षक नियुक्त केले जातील व त्यांचा निकाल सर्वांवर बंधनकारक राहील .या निकालाला कोठेही आव्हान देता येणार नाही.

स्पर्धंकांनी आपला निबंध ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आशा कुलकर्णी , महासचिव –हुंडाविरोधी चळवळ, मुंबई, ४ /५० विष्णूप्रसाद ‘बी ‘ सोसायटी, शहाजीराजे मार्ग, पार्ले बिस्कीट फॅक्टरी जवळ, विलेपार्ले (पूर्व ) मुंबई ४०००५७ येथे पाठवावा.

संपर्क: दूरध्वनी : ०२२-२६८३६८३४ / २६८३६१३२
भ्रमणध्वनी : ९८१९३७३५२२ अथवा ९८१९५३९१९३. टपाल सेवा ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्ववत सुरु न झाल्यास ३१ ऑगस्टपुढे मुदत वाढवण्यात येईल.
इमेल : antidowry498a@gmail.com.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments