सुसंस्कृत समाजाला कलंक असलेल्या हुंडा प्रथेविरोधात हुंडाविरोधी चळवळ, मुंबई ही सामाजिक संस्था ५३ वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेतर्फे २६ नोव्हेंबर रोजी १९९२ पासून हुंडा विरोधी दिवस व त्या नंतरच्या पंधरवड्यात १० डिसेंबर मानवाधिकार दिनापर्यंत युवापिढीसाठी विविध जाणीव जागृतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महाराष्ट्र शासनानेही वर्ष २००५ पासून या उपक्रमास पाठिंबा दिला आहे.
स्त्री पुरुष समानता आणि सर्वाना समान संधी ही प्रमुख वैशिष्ठे असणारी राज्य घटना भारतीय लोकांनी, लोकांसाठी बनवली आणि स्विकारली तो दिवस २६ नोव्हेंबर. वरील दोन्ही प्रमुख आणि वैशिष्ठ्यपूर्ण तत्वांना छेद देणारी हुंडा ही दुष्ट रूढी आजही अनेक जीव व कुटुंबे उध्वस्त करत आहे. म्हणून हुंडा प्रथेविरोधात युवा पिढीची मानसिकता तयार व्हावी, यासाठी युवकांना या विषयावर विचार करायला लावून बोलते करण्यासाठी दर वर्षी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व तसेच निबंध लेखन स्पर्धा आयोजित केल्या जातात. या उपक्रमाचे यंदा ३८ वे वर्ष असून रविवार दिनांक ७ डिसेम्बर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता विलेपार्ले (पूर्व) मुंबई येथे साठ्ये महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

“निबंध स्पर्धा”
निबंध लेखन स्पर्धेमध्ये निबंध महाविद्यालयाच्या प्राच्यार्यांमार्फत १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पाठवायचे आहेत. महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यापीठांच्या विविध विभागातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. दोन्ही स्पर्धांमध्ये भाषा विकल्प मराठी, इंग्रजी आणि हिंदी असून प्रथम क्रमांकाच्या महाविद्यालयाला ट्रॉफी तसेच प्रथम तीन क्रमांकांच्या विजयी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके आणि उल्लेखनीय एकूण दहा प्रशस्तिपत्रे दिली जातील.
दोन्ही स्पर्धांचे विषय सारखेच असून ते पुढील प्रमाणे :
मराठी :
१) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व.
२) हुंडा रुढीच्या निर्मूलनासाठी विद्यमान कायद्यांची निष्प्रभता.
३) भारतीय संविधानातील समानतेचे मूलतत्व हुंड्याची रूढी कशाप्रकारे विफल करते ?
English :
1) Importance of Freedom of Speech & Expression.
2) Futility of present Laws to eradicate the Evil Custom of DOWRY. 3) How the Custom of DOWRY defeats the principle of equality imbibed in Indian Constitution ?
हिंदी :
१) भाषण और अभिव्यक्ती स्वतंत्रताका महत्त्व.
२) दहेजकी दुष्ट रूढी निर्मूलन हेतू विद्यमान कानूनोंकी निष्प्रभता.
३) भारतीय संविधानमें स्थित साम्यवादके मूलतत्वको दहेज प्रथा कीस प्रकार विफल करती है ?.
अधिक माहितीसाठी संपर्क : आशा कुलकर्णी, महासचिव – : ९८१९३७३५२२ / ९८१९५३९१९३.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.
