आखाड सासरा बरसून गेला
तृप्त जाहली धरणीमाता
सण, उत्सव घेऊनिया आला
श्रावण आला श्रावण आला
अमृतास त्या प्राशन करूनी
शांत जाहला सागर आता
धीवर सारे पूजन करिती
मनोभावे श्रीफल अर्पिती आता
नारळीपूनम अशी साजरी
करिती अतिशय प्रेमाने
तृप्त होऊनि श्रावणसरी
इंद्रधनुने खुलविती मने
रेशमी धागे गुंफण करिती
घट्ट वीण ती नात्याची
सुंदर राखी प्रतीक आहे
बंधुभगिनी प्रेमाची
द्रौपदीस तो कृष्ण सखा
अन् सैनिक बंधु देशाला
‘राखीपौर्णिमा’ करु साजरी
बांधुनिया त्या राखीला

— रचना : स्वाती दामले.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800