मोबाईलचे सर्वत्र वारे
दिखाव्यात गुंतले सारे
मोबाईलचा अती नाद
हरवत आहे आज संवाद
मोबाईल म्हणजे मायाजाल
जरा जपून तू चाल
चंचल मन न कोणती उसंत
जरा ही न वाटे त्याची खंत
स्वतः मध्येच रमले सारे
कसले हे आधुनिकतेचे वारे
भेटीगाठी दुर्लभ स्थिती
भावनेत न कोणा रुची
व्हाट्सअँप,फेसबुक, इन्स्टाग्राम
राहिले नाही जगण्याचे भान
स्टेटसची अजब फसवणूक
तुलनेत हरपते तहान भूक
मायावी ही फसवी जाळ
स्वतःला जरा तू सांभाळ
नात्यांची उसवत चालली वीण
अती मोबाईल वाढवतो शीण
पूर्वीसारख्या न राहिल्या गप्पा
न आपलेपणाचा तो कप्पा
रिल्सचा नुसता धुमाकूळ
चढाओढीचे भलते खूळ
लाईक कॉमेंट्सचे ओझे
जगणे राहिले न ते सोपे
मोठेपणाचा अट्टाहास
जीवाला नुसता मनस्ताप
मोबाईल ने घातली भूल
हरवत चालले अल्लड मुल
मान, पाठीचा मोडतो कणा
झोपेचाही होतो खेळखंडोबा
सोयी सुविधांचे हे साधन
घाला त्याला बंधन
घाला त्याला बंधन.

— रचना : सौ रश्मी हेडे.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 91 9869484800

खूप छान,
मोबाईल मुळे सर्वांच्या जीवनात झालेले परिणाम, उसवत चाललेली नाती, हरवत चाललेली आपुलकी, मोबाईल मुळे होणारा नात्यातील दुरावा, स्टेटस, रेसची चळवळ लाईक्स या या सर्वांची सुंदर चित्रण या कवितेत आले आहे.
रश्मी मॅडम खूपच छान कविता