Saturday, October 18, 2025
Homeलेखमुलखावेगळा छंद

मुलखावेगळा छंद

कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन सुरू आहे. घरात बसून वेळेचं काय करायचं ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. एरव्हीही निवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न असतोच. यातून मदन लाठी यांनी चांगला मार्ग शोधला आहे. जाणून घेऊ या,त्यांच्या मुलखावेगळ्या छंदाविषयी…….. छंद म्हणजे प्रत्येकाने आपआपल्या आवडी प्रमाणे जोपासलेली कला, मग ती कोणतीही असु शकते. छंदाला चौकटीत बांधता येणार नाही. छंद म्हणजे हा अशा प्रकारचा आनंद आहे की,तो विकत घेता येत नाही.

आजच्या युगात परमेश्वराने प्रत्येकास कोणत्या न कोणत्या प्रकारची कला दिलेली आहे . फक्त त्या कलेस अंतर्मनातुन बाहेर आणल्यास त्याचा आनंद वेगळाच असतो . त्या आनंदाची कल्पना करता येत नाही. मग तो छंद कुठलाही असो गाण्याचा, खेळण्याचा, वाचनाचा असे विविध छंद होत.
एक मुलखावेगळा छंद जोपासला आहे तो मदन लाठी यांनी.

मदन लाठी

३ वर्षांपूर्वी खाजगी नोकरीतून ते निवृत्त झाले आहेत.मूळ जळगावचे असणाऱ्या पण आता पुण्यात राहणाऱ्या लाठी यांनी गेल्या पाच सहा वर्षांपासून हा छंद जोपासला आहे.
हा छंद म्हणजे, रोज ज्यांचा वाढदिवस असेल अशांना, त्यात आदरणीय राष्ट्रपती, आदरणीय पंतप्रधान, मुख्यमंत्री,केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री , सचिव,उद्योगपती, विविध खेळाडू, सेलेब्रिटीज, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, खाजगी, सामाजिक व विविध राजकीय नेते , सेलिब्रिटीज आदिंचा समावेश आहे.

ज्यांचा वाढदिवस असतो किंवा ज्या कुणाचे प्रमोशन झाले आहे आणि ज्यांची माहिती त्यांच्याकडे असते अशा आदरणीयांना ते विविध माध्यमांद्वारे संपर्क साधण्याचा किंवा शुभेच्छा पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. ही विविध माध्यमं म्हणजे ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हाट्सएप, एसएमएस , टेलीफोनद्वारे आणि शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट होय. या छंदाचा त्यांना छान प्रतिसाद मिळतो. या मान्यवरांकडुन त्यांना शुभेच्छा पोहोचल्याची पत्रेही येतात. त्यात प्रामुख्याने प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी , माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग , राष्ट़पतींचे सचिव, केंद्रीय गृहमंत्री, आरोग्यमंत्री, सांस्कृतीक मंत्री, उपराष्ट्रपती, राज्यपाल काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रालयातील विविध सचिव (आजी आणि माजी), पोलिस आयुक्त (आजी आणि माजी ), उद्योगपती, सिने सृष्टीतील, विविध पक्षांचे राजकीय नेत्यांचा, समाजातील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहेे.

या प्रतिसादाने लाठी यांचा आनंद गगनात मावत नाही . त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आयुष्याचा प्रवास सुखकर होण्यास मदत होते,असे ते म्हणतात. या व्यतिरिक्त कुणा शासकीय अधिकाऱ्याचे प्रमोशन झाल्यास त्यांनाही तें शुभेच्छा पाठवितात. याशिवाय कुणा मोठ्या माणसाकडे निधन झाले असेल तर त्यांना ते शोक संदेश पाठवितात. या छंदामध्ये ते कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता एकच लक्ष्य ठेवतात,ते म्हणजे इतरांना आनंद, समाधान देण्याचा.
यासाठी लाठी यांना रोज ३ तास तरी लागतात.खूप परिश्रम घ्यावे लागतात. पण त्यामुळे जो आनंद मिळतो त्याचे ते वर्णन करु शकत नाही. परमेश्वराने जितके दिवस दिले आहे ते सर्व या छंदामध्ये त्यांना घालवायचे आहेत.

याशिवाय लाठी नियमित रक्तदाता असुन दर ४/५ महिन्यानंतर रक्तदान करुन ते देशाची सेवा करतात.आणि रक्तदानामुळे जिवनदान देण्याचा प्रयत्न करतात. या संदर्भात केन्द्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी त्यांचे दोन वर्षापुर्वी , १४ जुन या रक्तदाता दिवशी अभिनंदन केले असुन रक्तदान नियमित सुरू ठेवावे असे सांगितले.

लाठी आणि त्यांच्या पत्नीने नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यामुळे कुणास तरी दृष्टी मिळेल. या बाबतीत जनजागृती व्हावी यासाठी राष्ट्रव्यापी प्रचार करण्याचा त्यांचा मानस आहे. श्रीयुत लाठी यांना त्यांच्या उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा.

By देवेंद्र भुजबळ, 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

46 COMMENTS

  1. लाठी साहेब, आपण निस्वार्थी पणाने खूपच छान आणि कौतुकास्पद काम करीत आहात.
    आपल्या कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा…

    नितीन फिरके

  2. आमचे मदन भाऊ म्हणजे सर्वमित्र आहेत
    सदानंदी आणि उत्साही ,सतत काहीतरी नवीन करणे, लिहिणं नवीन मित्र जोडणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
    भाऊ आपल्या कार्यास मनःपुर्वक शुभेच्छा
    आपलाच
    सि एस नाईक

  3. श्री मदन लाठी आणी आम्ही , २० वर्षांहून जास्त काळ शेजारी काढला आहे. मी त्यांचा, छंद जोपासण्यासाठी ची धडपड जवळून बघीतली आहे.
    सुरवातीला थोड आश्र्चर्य ही वाटायचं की या व्यक्ती ला काय समाधान मीळत असेल यातुन.
    पण ही माहिती मीळवण्याची धडपड निश्चित कौतुकास्पद होती … आजही ती आहे.
    या माध्यमातून त्यांनी मोठा जन संपर्क ही निर्माण केला आहे.
    मी मदनजी लाठी यांचे खुप खुप अभीनंदन करतो आती भुजबळ यांनी चांगली मांडणी केल्या बद्दल धन्यवाद देतो.
    ., सतीश चरखा
    सख्खा शेजारी

  4. श्री मदन लाठी आणी आम्ही , २० वर्षांहून जास्त काळ शेजारी काढला आहे. मी त्यांचा, छंद जोपासण्यासाठी ची धडपड जवळून बघीतली आहे.
    सुरवातीला थोड आश्र्चर्य ही वाटायचं की या व्यक्ती ला काय समाधान मीळत असेल यातुन.
    पण ही माहिती मीळवण्याची धडपड निश्चित कौतुकास्पद होती … आजही ती आहे.
    या माध्यमातून त्यांनी मोठा जन संपर्क ही निर्माण केला आहे.
    मी मदनजी लाठी यांचे खुप खुप अभीनंदन करतो आती भुजबळ यांनी चांगली मांडणी केल्या बद्दल धन्यवाद देतो.
    ., सतीश चरखा
    सख्खा शेजारी

  5. Great hobbies and inspiration to all who has plenty of time but don’t use wisely. Blood donation on regular intervals is not only keep you healthy but give life to needy people. Great dear Madan

  6. श्री मदन लाठी यांनी हा एक आगळा वेगळा छंद जोपासला आहे. अनपेक्षित रित्या कुणाकडून शुभेच्छा मिळाल्याने माणसाचा नुसता आनंदच व्दिगुणित होत नाही तर सकारात्मकताही वाढते. अर्थात फक्त पहिल्या वेळेस शुभेच्छा अनपेक्षितरित्या मिळतात, त्यानंतर दरवर्षी न चुकता.
    त्यांच्या शुभेच्छांचा मी ही एक लाभार्थी आहे.
    त्यांचा हा छंद यापुढे उत्तरोत्तर समृद्ध होत जावो या शुभेच्छा.

  7. It’s great hobby,it shows your affection & attachment with community. Wishing prosperous future, Congrats👍💐, Jalgaon

  8. HAPPY AFTERNOON SIR.
    My views about Mr. Madanji Lathi. — Dear Madan Sir, your social activities are laudable. You are a source of inspiration for youth. You are nicely showing the way as to how to develop our network of people. You are using your time effectively and meaningfully. You are an idol for us. Best wishes for your future social activities.👍🌹😊

  9. आपला स्नेहांकित डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे, पुणे आपला स्नेहांकित डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे, पुणे

    जागर छंदाचा… प्रणेते मदन लाठी

    मित्रांनो मदनजी लाठी म्हणजे आमच्या खानदेशातील एक असामान्य व्यक्तिमत्व
    मदन लाठीजीना हे मिळालेले यश त्यांना सहजासहजी प्राप्त झालेलं नाही तर त्यांना एक मुलखा वेगळा छंद जोपासावा लागला आहे.
    मित्रांनो आपण एखादा गुणधर्म सांगण्यासाठी प्रतिकांचा वापर करतो, जसे जे चिरंतन आहे, त्याला आपण अमृत म्हणतो. जे अखंड आहे त्याला आकाश म्हणतो आणि जे स्वतःला आणि इतरांना सुगंध देत त्याला चंदन म्हणतो कारण चंदन हे त्याग, प्रेम ,वात्सल्य, मांगल्य अशा मूल्यांच प्रतीक आहे आणि हे मूल्य धारण करण्याचे गुणधर्म अशाच व्यक्तिमत्वाच्या हस्त स्पर्शातच सामावून जातात., त्यांनाच आपण चंदनाचे हात म्हणतो आणि हे हात धारण करणारे म्हणजे आपले मदन लाठी ,कारण ते भगवान श्रीकृष्णाने गीतेतील एका अध्यायात वर्णन केल्या प्रमाणे
    ” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” अशा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या आयुष्याची वाटचाल करीत आहेत .त्यात अनेक सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणे, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्ट, कौशल्याने विविध क्षेत्रात प्राप्त केलेल्या यशाचं मनापासून कौतुक करणे हा त्यांचा निर्मोही स्वभाव आहे.
    मित्रांनो, हे सांगणे सोप आहे पण हे सर्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सिंहाचं काळीज लागतं आणि ते काळीज धारण करणारे म्हणजेच आपले सर्वांचे परिचित असलेले निष्काम ,कर्मयोगी श्री मदन जी लाठी अशा मदनजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ,कौतुक करतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की जोपर्यंत पृथ्वीतलावर गंगा आणि भागीरती यांचं वास्तव्य आहे ,आसमंत प्रकाशमान करणारा सूर्य आहे आणि साक्षात परमेश्वराच अस्तित्व आहे, तोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात यश मिळो, हीच त्या निर्गुण, निराकार परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो. आपला स्नेहांकित डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे, पुणे

  10. जागर छंदाचा… प्रणेते मदन लाठी

    मित्रांनो मदनजी लाठी म्हणजे आमच्या खानदेशातील एक असामान्य व्यक्तिमत्व
    मदन लाठीजीना हे मिळालेले यश त्यांना सहजासहजी प्राप्त झालेलं नाही तर त्यांना एक मुलखा वेगळा छंद जोपासावा लागला आहे.
    मित्रांनो आपण एखादा गुणधर्म सांगण्यासाठी प्रतिकांचा वापर करतो, जसे जे चिरंतन आहे, त्याला आपण अमृत म्हणतो. जे अखंड आहे त्याला आकाश म्हणतो आणि जे स्वतःला आणि इतरांना सुगंध देत त्याला चंदन म्हणतो कारण चंदन हे त्याग, प्रेम ,वात्सल्य, मांगल्य अशा मूल्यांच प्रतीक आहे आणि हे मूल्य धारण करण्याचे गुणधर्म अशाच व्यक्तिमत्वाच्या हस्त स्पर्शातच सामावून जातात., त्यांनाच आपण चंदनाचे हात म्हणतो आणि हे हात धारण करणारे म्हणजे आपले मदन लाठी ,कारण ते भगवान श्रीकृष्णाने गीतेतील एका अध्यायात वर्णन केल्या प्रमाणे
    ” कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” अशा कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपल्या आयुष्याची वाटचाल करीत आहेत .त्यात अनेक सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणे, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्ट, कौशल्याने विविध क्षेत्रात प्राप्त केलेल्या यशाचं मनापासून कौतुक करणे हा त्यांचा निर्मोही स्वभाव आहे.
    मित्रांनो, हे सांगणे सोप आहे पण हे सर्व प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी सिंहाचं काळीज लागतं आणि ते काळीज धारण करणारे म्हणजेच आपले सर्वांचे परिचित असलेले निष्काम ,कर्मयोगी श्री मदन जी लाठी अशा मदनजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ,कौतुक करतो आणि परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की जोपर्यंत पृथ्वीतलावर गंगा आणि भागीरती यांचं वास्तव्य आहे ,आसमंत प्रकाशमान करणारा सूर्य आहे आणि साक्षात परमेश्वराच अस्तित्व आहे, तोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात यश मिळो, हीच त्या निर्गुण, निराकार परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या शब्दांना विराम देतो. आपला स्नेहांकित डॉक्टर शाळीग्राम भंडारी तळेगाव दाभाडे, पुणे

  11. Dear Madan bhau – your are giving a yeoman service. You are a source of inspiration for young generation. You rightly pointed how to use free time. You are an ideal for youngsters. I wish all the best for your future inspiring work. You have shown how to make connectivity with people.

  12. Very nicely presented by Shri Devendraji Bhujbal about hobby of Shri madan lathi. Indeed a good way being connected.
    Thanks

  13. I like his blood donation work and they (Mr. & Mrs.) have also declared next aim to donate eye. It is very big step in life. Best wishes for big social work other than these activities.

  14. I like his blood donation work & they have also declared next aim to donate eye. It is very big step in life. Best wishes for next big social work other than these activities.

  15. मदन, तुझ्या या आगळ्या‌वेगळया छंदा साठी तुझे अभिनंदन…
    हां छंद असाच जोपासत रहा….
    तुझ्या या ‌‌‌कार्या साठी हार्दिक शुभेच्छा ….

  16. Dear Lathi Saheb, Really good work !!! Through your writing we are able to connect to celebrities, senior Government Officials. Thanks for sharing.

  17. लाठी सरांबदल खुप छान माहिती दिलीत भुजबळ सर.
    लाठी सर तुमचा छंद सर्वांना प्रेरणा देणारा आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात काळात लक्षात ठेवणे, शुभेच्छा देणे दुर्मिळ झाले आहे. सोशल मीडिया वर कळले तर शुभेच्छा पास करणे, नाही तर नाही,अस झाल आहे. तुमचा छंद खुप छान वाटला. 🙏🙏

  18. मदन भाऊ आपले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे आपण मला ही नियमित वाढदिवसाच्या शुभेच्छा तसेच दिवाळी-दसरा व इतर सणांच्या वेळी आवर्जून फोन करून शुभेच्छा देतात त्यामुळे पुढे कार्य करण्यास खूप एनर्जी मिळते मी आवर्जून आपल्या शुभेच्छांचे वाट पाहतो या लेखाच्या निमित्ताने आपला छंद समजून आला नक्कीच कौतुकास्पद आहे ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो ही सदिच्छा जय हिंद पोलीस निरीक्षक अशोक साखरे

  19. खरे तर लाठी सर आणि भुजबळ सर दोघांचे अभिनंदन … क्षेत्र जरी वेगळे असले तरी दोघांचे कार्य महान आहे. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण.हाच तर माणुसकी धर्म आहे.सरांनी जो लेख लिहिला. यातून प्रेरणा तर मिळतेच शिवाय कौतुकाची थाप सुद्धा मिळते. सरांकडून अशाच लेखनाची अपेक्षा… पुन्हा एकदा दोघांना भावी वाटचालीस शुभेच्छा…

  20. प्रिय मदन भाऊ आपल्या स्तुत्य उपक्रमांचं,अभिमानास्पद अशा छंदांचं कौतुक
    करावं तेवढं थोडच आहे.तुम्ही हा जो छंद जोपासलाय
    यासाठी आभाळाएवढं मन लागतं आणि तसं विशाल
    मन तुम्हाला देवाला दिलय.त्याचा तुम्ही योग्य उपयोग
    करत आहात.तुमच्या आनंदी निरोगी प्रसन्न मनाचं
    रहस्य तुमच्या या छंदात दडलय.जो दुसऱ्याला आनंद
    देतो त्याला देव सदैव आनंदी ठेवतो.आपला छंद लोकांपर्यंत पोचवल्याबद्दल श्री भूजबळ सरांना खूप
    खूप धन्यवाद. आपले खूप खूप अभिनंदन व हा छंद असाच चालू रहावा यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  21. सरजी अनोखा उपक्रम,या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक वंचित व्यक्तींचे प्रेरणादायी कार्य आपल्या पोर्टलच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहचत आहे.
    प्रेरणादायी व्यक्तींसाठी हे पोर्टल एक उत्तम साधन बनले आहे,खुप छान आणि अत्यंत प्रेरणादायी उपक्रम सरजी.

  22. अभिनंदन मित्रा मदन तुझे सगळे लेख आम्ही वाचतो पण भुजबळ सरांनी खरच सुंदर आणि छान काम केले आहे धन्यवाद भुजबळ सर ,तुम्ही आमच्या मित्राचा मुलखा वेगळा छंद टिपला खूपच आनंद झाला पुनश्च धन्यवाद

  23. अतिशय चांगली माहिती. छंदाला आणि कार्याला कसलीही मर्यादा नाही. अमर्याद गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला आनंद मिळतो. तुमचेच कार्य पहाना, अशा वेगवेगळ्या व्यक्तीना शोधून त्यांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवणे यासाठी तुमचा बराच वेळ खर्च होतो,पण तुम्हाला मिळणाऱ्या समाधानाला मोल नाही,ते अमोल आहे, अतुलनीय आहे.तुम्हाला परमेश्वर आनंद, आरोग्य व दिर्घायु प्रदान करो हीच मनापासून प्रार्थना.

  24. खुप छान उपक्रम आहे, रक्तदान तर नेहमीच करतात साधारण सेंच्यूरी झालेली असेल रक्तदानाची. कितीरी जणांना जीवदान सुध्दा मिळले असेल रक्तदानातून

  25. Your work is very much valuable to those who work hard but never get a chance to shine. Vis-a-vis it is aspirations to a new one to work hard to make their work worthy of shine.__sharad borkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप