सुप्रभात दरवळली
मोगऱ्याच्या सुगंधात न्हायिली,
झाली फुले कळ्यांची,
चांदण्याच हसत येती खाली
मन मोहित पवित्र बरसात गंधाची
हृदयी भरून राही,
जीवनात रहा सदैव, सुस्मित हीच
एकमेकां द्या ग्वाही
आनंद वाटण्या हा जन्म फुलांचा
हा खेळ धरतीवरी
मांडियेला देवाने, शुभ्र चांदण्याचा
त्यारुपे मांगल्य भुवरी
हिरव्या पानी, छोटी कमळे जणू
धवल मोगऱ्याची
सौख्याची बरसात दाहीदिशा पसरे
अशी राहो साथ एकोप्याची

– रचना : स्वप्नगंधा आंबेतकर.
सुंदर कविता