माणसाचे चाळीस हे वय स्थिर सावर झालेले असते.शिक्षण, लग्न होऊन माणूस आपल्या निवडलेल्या नोकरीत, व्यवसायात, संसारात स्थिरावलेला असतो. अहमदनगर येथील डॉ. शारदा याही अशाच त्यांच्या संसारात, हॉस्पिटलमध्ये मग्न होत्या. पण मनात कुठे तरी सल होती , ती म्हणजे आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट पदवी घ्यायची होती, ती लग्न, मुलेबाळे, व्यवसायामुळे राहून गेली याची. शेवटी मनाची तयारी करून त्यांनी एम.एस. करायचं ठरवलं. पती डॉ. प्रशांत यांनीही त्यांना पूर्ण प्रोत्साहन आणि सहकार्य दिलं आणि पुढे स्पर्धा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन कौटुंबिक जबाबदाऱ्या, हॉस्पिटल संभाळून अतिशय चिकाटीने, जिद्दीने डॉ. शारदा यांनी नुकतीच एम. एस. पदवी संपादन केली.
या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
देवेंद्र भुजबळ.9869484800.