Sunday, July 13, 2025
Homeसाहित्ययेणारा तर यायचाच्...

येणारा तर यायचाच्…

येणारा तर यायचाच्, अन् जाणारा जायचाच् ;
ढळणारा सूर्य पुन्हा, क्षितिजावर यायचाच्

कोरडल्या ढेकळात, झरताना स्नेहधार ;
पान्होळा मातीचा, मायेने उलायचाच्

स्मरणाच्या चांदण्यात, गजबजता आठवणी,
हुंदकाहि हिरमुसला, आसवे विणायचाच्

कविता ती लाजखुळी, नाही घेत जवळ तशी ;
वावर प्रतिभेचापण, अ्ंतरी जपायचाच्

प्राणांच्या ओंजळीत, हसताना शत नाती ;
मरणाचा हात शिरी, आपल्या असायचाच्

श्रीकृष्ण बेडेकर

– रचना : श्रीकृष्ण बेडेकर, इंदूर

टीप : मराठी भाषेला मी आजवर अनेक नवे शब्द दिले, या गझल मधून त्यात आणखी दोन शब्दांची भर टाकली आहे.
. पान्होळा : पान्हा या अर्थी
. लाजखुळी : लाजरी बुजरी या अर्थी

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. गझल आवडली. वास्तवता दाखवणारी. नविन शब्दहि भावले. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments