Wednesday, September 17, 2025
Homeलेखकैरो : आजादी का अमृत महोत्सव

कैरो : आजादी का अमृत महोत्सव

ईजिप्तची राजधानी कैरो येथे आजादी का अमृत महोत्सव काल थाटात, अभिमानाने साजरा झाला.

सकाळचे प्रसन्न वातावरण. सुखद आल्हादक हवा. कैरो येथील भारतीय दूतावास ध्वजवंदनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाले होते. दूतावासाचे म्हणजे  ‘इंडिया हाऊसचे’ भव्य प्रांगण भगव्या, पांढऱ्या व हिरव्या फुग्यांनी, कमानींनी सजवले होते.

बरोब्बर नियोजित वेळेनुसार ईजिप्त मधील भारताचे राजदूत श्री. अजित गुप्ते ह्यांनी कमानीतून प्रांगणात प्रवेश केला आणि तिरंग्याची दोरी खेचताच, भारताचा मानदंड, तिरंगा डौलात फडकू लागला. राष्ट्रगीताची धून सुरू झाली. श्री अजित गुप्ते व उपस्थितांनी ध्वजाला सॅल्युट केला.

तोपर्यंत उन्हाची तीव्रता थोडी वाढू लागली. उपस्थितांना दूतावासाच्याच विस्तीर्ण प्रांगणात मंडप टाकले होते तिकडे बसण्याची सोय केली होती.
श्री अजित गुप्ते ह्यांनी सर्वांचे स्वागत करून भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचून दाखवला.

त्यानंतर राष्ट्रभक्तीपर गाणी, भारतातून आलेल्या कथ्थक नृत्य कलाकारांची नृत्ये, काही देशभक्तीपर वैयक्तिक गाणी असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.

मी सध्या कैरो मध्ये असल्याने मलाही माझ्या दोन कवितांचे वाचन करण्याची संधी मिळाली.
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गायन स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच NRI गट ‘स्थानिक गट; Embassy Staff अशा विविध गटांकरिता भारतविषयक माहितीपर आधारित Quiz, General knowldge अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचा बक्षीस समारंभ श्री गुप्ते हयांच्या हस्ते झाला.

स्थानिक नागरिक, NRI, विद्यार्थी, Embassy staff अशा सर्वांना समाविष्ट करण्याच्या राजदूत श्री. अजित गुप्ते यांच्या समायोजकतेचे कौतुक वाटले.

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर अल्पोपहार आयोजित केला होता. दूतावासाचा स्टाफ कुटुंबियांसमवेत, भारतीय लोक, ईजिप्तमधील लोक मिळून सुमारे ३०० लोक उपस्थित होते.
एकंदर वातावरण देशभक्तीने भारावलेले होते.

वर म्हटल्याप्रमाणे मी सादर केलेल्या २ पैकी एक हिंदी कविता पुढे देत आहे.

२०० साल से पहले
अंग्रेजोने हमारे गले
परतंत्रता की शृंखला पहनाई
हमने मजबूरन स्वीकार ली
क्योंकि
मराठा, राजपूत, सिक्खों की चुनौती
नाकाम रही
हमारी भारतमाता पर अंग्रेजोने
सौ साल से अधिक हुकुमत चलाई
हम गुलाम बनकर जीते रहे
मुडदों जैसी जिंदगानी
भारत माता शृंखला बद्ध रोती रही, रोती रही ॥

१८५७ में क्रांती की चिनगारी पडी
मंगल पांडे से शुरू हुई क्रांती की लडाई
भारत हमारा देश है
इस पर राज हमारा होगा
चेतना जाग उठी
“ये झाँसी मेरी है, इस पर राज मेरा होगा
मेरी झाँसी नही दूँगी”
गरज पडी, मर्दानी झाँसी की रानी
मर्दानी लक्ष्मी झाँसी की रानी ॥

क्रांती की मशाल जलने लगी
आग बढती रही
कूद पडे लाखो स्वतंत्र सेनानी
हजारो, लाखो पैरो तले कुचले
कई जेल बंद हुए
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव और हजारो
हसते हसते फांसी के तख्तो चढे
प्राणों का बलिदान देकर
अजरामर हुये, अजरामर हुए
सावरकर बंधु तथा हजारो, अंदमान जेल में जखडे गये
हजारो शहीद हुए
पर मात पिताने आँसू न बहाये
ये पुत्र हमारे है कहकर I
गर्व से माथा उठाकर
जीते रहे, जीते रहे”
इसी लिये आज मैं कहती हूँ
व्यर्थ न हो उनका बालिदान
आज भी हमारे शूर सैनिक
भूख, प्यास, की परवाह न करते
प्राणों की बाजी लगाकर
धूप, बर्फ के तूफान
का सामना करते करते
चौबीस घंटे तानकर सीना
सरहद का रक्षण हैं करते
भूल अपने मात पिता, पुत्र परिवार
प्राणों का करते है बलिदान, करते है बलिदान
शहीद होकर मनाते जशन आजादी का
तिरंगे में लिपटे घर लौट कर
ये भारत माँ के सपूत सैलानी
आजादी के रखवाले

अमर रहे यह शहीद हमारे
व्यर्थ न हो उनका बलिदान

स्वतंत्रता अमर रहे
भारत माता की जय पुकारो
अमृत महोत्सव के शुभ अवसर पर
जय हिंद, भारतमाता की जय..

सुलभा गुप्ते

– लेखिका : सुलभा गुप्ते. कैरो, ईजिप्त
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा