Homeकलालतादीदीची बाप्पाची आरती : एक अविस्मरणीय अनुभव

लतादीदीची बाप्पाची आरती : एक अविस्मरणीय अनुभव

मी तेव्हा मुंबईत होतो. सिनेमात गात असे. एके दिवशी लता मंगेशकर यांच्या आईसंबंधी चुकीची बातमी ऐकायला मिळाली.
त्यावेळी मी ताडदेवच्या फिल्म सेंटर स्टुडिओत एका गाण्याचे रेकॉर्डिंग होतो. ती बातमी ऐकल्यापासून मी खूपच अस्वस्थ झालो होतो. त्यामुळे त्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाल्यावर मी पेडर रोडवर असलेल्या दीदींच्या प्रभूकुंज या घरी धाव घेतली. तिथे बघितले तर वातावरण सामान्य होते.
माझ्या लक्षात आले की, मी ऐकलेली बातमी नव्हती तर ती अफवा होती ! मग बराच वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या.

ते नेमके गणपतीचे दिवस होते. मी जाण्यास निघालो तितक्यात दीदींचे गुरुजी गणपतीची आरती करण्यासाठी आले. तेव्हा दीदी मला म्हणाल्या की, आरती करून प्रसाद घेऊन जा. त्यामुळे साहजिकच मी तिथे थांबलो. गुरुजींनी पूजा करून आरती म्हणण्यास सुरुवात केली. तेव्हा मी दीदी शेजारी उभा होतो. नंतर दीदींनी स्वतः गणपतीची आरती गायली. क्षणभर माझ्या डोळ्यांवर, कानावर विश्वास बसेना, की दीदींचा आवाज मी मायक्रोफोन शिवाय ऐकत होतो म्हणुन ! तेव्हा त्या हॉल मध्ये उषादीदी, भारती वहिनी, छोटी राधा एवढेच जण होतो.

इतकी वर्षे झाली तरी दीदींचा तो स्वर आजही माझ्या कानात गुंजत असतो. त्यातही गणपतीचे दिवस आले की, सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून मी तल्लीन होऊन जातो.

दीदींच्या शेजारी, त्यांच्या घरी उभे राहून, त्यांनी गायलेली गणपतीची आरती ऐकायला मिळाली, या बद्दल मी स्वतःला खूप खूप भाग्यवान समजतो.
छायाचित्र सौजन्य : गुगल

उदय वाईकर

— लेखन : सिनेगायक उदय वाईकर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments