Friday, February 13, 2026
Homeसाहित्यमहानुभावांचे योगदान ( २० )

महानुभावांचे योगदान ( २० )

प्रसाद सेवा
‘प्रसन्न होऊन देईजो तो प्रसाद’ अशी प्रसादाची सुलभ व्याख्या भाष्यकार करतात. यामध्ये परमेश्वराचा प्रसन्नतारूप मनोधर्म असून स्पर्श संबंध असावाच लागतो . कारण सर्वज्ञ सूत्रात म्हणतात “संबंधु व्यक्त : व्यक्ते संबंधी अव्यक्ते प्रसन्नता परमेश्वर निक्षेपिती: मग आपुला संबंधु देति: म्हणौनि संबंधु वंद्यु:” म्हणजेच व्यक्त परमेश्वर वस्तूला संबंध देण्याच्या अगोदर दृष्टी आणि मनोधर्माने प्रसन्नतेचा निक्षेप करतात . मग संबंध देऊन पवित्रता आणली जाते. अशा प्रकारे तेथे कृपा आणि माया शक्तीचा निक्षेप होतो. म्हणजेच प्रसन्नता आणि संबंधाच्या अनुसंधानाशिवाय ‘प्रसाद’ ही संज्ञाच परिपूर्ण होत नाही.

महाराष्ट्रातील पायी परिभ्रमणामध्ये बाराव्या शतकात सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू खडकुली परिसरात वास्तव्याला असताना सर्वज्ञांनी इंद्रभट्टांना आचार्य नागदेवाकरवी बोलावून घेतले. परमेश्वरपूरीहूनी आलेले प्रसाद वस्त्र बाईसा करवी मागवून घेतले. प्रसन्नतारूप मनोधर्म धारण करून समग्र अवयवाचा संबंध दिला . असेखा गुरुकाळाच्या हेतुस्तव तो पवित्र प्रसाद फुटा इंद्र भटांकडे सुपुर्द केला. तत्प्रसंगी प्रसादाचे महत्त्वही विशद करून प्रसादाच्या ठिकाणी कशाप्रकारे विधी विधान करावे हेही स्पष्ट केले.

प्रसादाचे प्रकार -:
प्रसादामध्ये मुख्यतः दोन प्रकार आढळतात. एक मूर्तीनिष्ठ प्रसाद तर दुसरा विषयनिष्ठ प्रसाद. मूर्तीनिष्ठ प्रसाद म्हणजे समवाय लक्षण संबंधाने प्रत्यक्ष श्रीमुर्तीचा पवित्र अंश प्रसन्नतेने दान देणे होय. उदा. रिद्धपूर येथे श्रीप्रभू गोसावियांनी साधाईसाला प्रसन्न होऊन नख, दाढ आणि केश कळाप या तीन मूर्तीनिष्ठ वस्तू प्रसाद म्हणून दिल्या.

सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू आणि श्रीगोविंदप्रभू अशा उभय अताराच्या सेवा लक्षण संबंधाने उपयोगी केलेले वस्त्र, धातू इत्यादी वस्तूंना विषयनिष्ठ प्रसाद असे म्हणतात. याविषयनिष्ठ प्रसादामध्ये मुख्यतः कापूस, कोसला, रोम, चर्म, धातू, दात, कास्ट, पाषाण अशा आठ प्रकारच्या घटकांचा समावेश होतो. एकूणच प्रसादामध्ये दोन मुख्य आणि आठ उपप्रकारांमध्ये प्रसादाचे वर्गीकरण केले जाते.( क्रमशः)

प्रा डॉ विजया राऊत

– लेखन : प्रा डॉ विजया राऊत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11