महाराष्ट्र शासनाचे, निवृत्त सहसचिव, लेखक, कवी
श्री राजाराम जाधव हे सध्या सपत्नीक केरळ मध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत. तिथला निसर्ग पाहून त्यांना अलेप्पी ते पेरियार या दरम्यानच्या प्रवासात सुचलेली कविता, आज आपण वाचू या.
– संपादक
पहाटेच्या प्रहरी
कोकीळा गाते छान
गोड आवाज ऐकून
गोड आवाज तिचा
ईश्वराची देण आहे
जरी काळा रंग तिचा
गोड ती गाते आहे
कभी सुख, कभी दुख
हेच आहे जीवन सार
हर क्षणी सुख मानुन
आपण राहावे तयार
आपण काय सोबत आणले
सोबतही काय नेणार आहोंत
जे काही आहे इथले
इथेच सोडून जाणार आहोत
मुलाबाळांचा व्याप
ऊगा डोक्यात ठेवता
त्यांचे ते बघून घेतील
कशाला ओझे वाहता
चिंता कसली करता
मनातून काढून टाका
जीवन मस्त जगा
भले प्रसंग असो बाका

– रचना : राजाराम जाधव. नवी मुंबई.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800