ज्येष्ठ शिक्षणसम्राट, बिहारचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज, 4 ऑगस्ट 2026 रोजी निधन झाले. त्यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी उद्या, बुधवारी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथे ठेवण्यात येणार आहे. तर अंत्यसंस्कार सायंकाळी 5 वाजता डी वाय पाटील मेडिकल कॉलेज लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे.
अल्प परिचय : –
डॉ. डी. वाय. पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला होता. ते ज्येष्ठ शिक्षणसम्राट, बिहारचे माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील ग्रुप चे संस्थापक होते. त्यांच्या नावाने नवी मुंबईतील नेरुळ येथे प्रसिद्ध डी. वाय. पाटील स्टेडियम आहे. शैक्षणिक आणि सामाजिक योगदानासाठी १९९१ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले होते.
डॉ डी. वाय. पाटील यांनी १९८३ मध्ये डी. वाय. पाटील ग्रुपची स्थापना केली. आज या ग्रुपच्या वतीने नवी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे १५० हून अधिक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन आणि क्रीडा संस्थांचा समावेश आहे. त्यांनी नवी मुंबईतील, नेरुळ येथे ६०,००० आसनक्षमता असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बहुउद्देशीय क्रीडांगण उभारले आहे.
डॉ डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
