तू जग तुला हवे तसे
तू जग तुला हवे तसे
हे बोलणे जितके सोप वाटते
जगणे तेवढेच कठीण असते
मन मारून रहावे लागते
सत्य दडपूण ठेवावे लागते
दिसते ते खरे नसते
असते ते लपवावे लागते
जे पाहिजे ते मिळत नसते
जे मिळते ते नकोसे वाटते
सर्वांची मन जपण्याचा नादात
आपलेच मन रुसून बसते
कुंपण तोडणे शक्य नसते
सहन करणे जास्त सोपे वाटते
खोटे खोटे जगावे लागते
उसने हसू आणावे लागते
आत एक, बाहेर एक
मनुष्याचे चेहरे अनेक
जगणे कठीण होऊन बसते जेव्हा
चांगल्या वागण्याचं ओझं वाटते
आयुष्याचे गणित फसते
आपले म्हणणारे कोणीच नसते
व्यक्त होणे वेडेपणा ठरते
अबोल्यात शहाणपण असते
ह्या व्यवहारी जगात
हृदयाला काही किंमत नसते
जेव्हा सर्वांच्या अपेक्षांचे
ओझ्याखाली जगावे लागते
लोक काय म्हणतील ?
ह्या प्रश्नाला उत्तर देणे कठीण वाटते
लढाई काही संपत नसते
रोज नव्याने जगावे लागते
जीवन सापशिडीचा खेळ आहे
शिडयांपेक्षा सापाची भीती जास्त आहे
पाय ओढणारे जास्त असतात
आपलीच माणसे आपल्याला फसवतात
अनपेक्षित लोक साथ देतात
जेव्हा जवळचे दूर लोटतात
कठोर शब्दाने घायाळ करतात
मनावर न दिसणारे ओरखडे उमटतात
शेवटी हा नशिबाचा खेळ आहे
ज्यापुढे मनुष्य ही हतबल आहे.

रचना : रश्मी हेडे.
खुपच वास्तविक कविता..मनाचा कोंडमारा..अचूक शब्दात मांडला आहे
Khup sunder
अतिशय सुरेख अशी मार्मिक आणि वास्तववादी भाव आसणारी कविता मनाला भावते. आन्तर्वेदनांचे पडसाद वाचकांच्या मनावर उमटतात. संस्कृती, चाली, रिती, भाती, संस्कार, या ओझ्याखाली स्वत:साठी जगायचे राहूनच जाते. तू जग तुला हवे तसे अशी साद मनाला कितीही घालण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्यक्षात सभोवतालची परिस्थिती तसे करण्यास मुभा देत नाही. खुप छान वाटते ही कविता वाचुन….खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन रश्मी जी.🍁🌷🍁🌷🍁🌷👏👏👏👏👏👏 एक वाचक शब्द स्नेही…रमेश वाघमारे