कोरोना काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता सतत सर्व सामान्यांना मदत करणारे, जनतेच्या मनातील उरणचे खरे कोव्हिड योद्धा माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी कोरोना संकटात गरजू दिव्यांगांना आधार मिळावा या हेतूने उरणच्या दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू वाटपाचा निश्चय केला आणि कन्या नम्रताच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तो पूर्ण केला.
श्री भोईर यांनी उरण तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींना तांदुळ, गव्हाचे पिठ, साखर, गोडेतेल, कांदे, बटाटे, मुगडाळ, मसाला, हळद, चहा पावडर, मीठ आदि जीवनावश्यक वस्तूंसोबतच कोरोना पासुन संरक्षण व्हावे म्हणून सँनिटायझर बाँटल आणि मास्कचे वाटप केले.
श्री भोईर हे रायगड जिल्हा परिषदेत असल्यापासुन ते आजतागायत नेहमी दिव्यांगांच्या पाठीशी राहून सातत्याने दिव्यांगांना आधार देत आले आहेत. आपल्या आमदारकीच्या कारकीर्दीत त्यांनी आपला आमदार भत्ता सुद्धा दिव्यांगांना वाटप करुन त्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
आता कोरोना काळात शेकडो दिव्यांगांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने विविध माध्यमातून त्यांचे कौतूक होत आहे.

– लेखन : पत्रकार, विठ्ठल ममताबादे.
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800.
कौतुकास्पद कामगिरी.
Mr.भोईर खूपच चांगले कार्य करीत आहात.