Homeसाहित्यबाप माझा हो विठ्ठल

बाप माझा हो विठ्ठल

माझ्या घरातच माझी विठ्ठल नि रखुमाई
बाप माझा हो विठ्ठल आणि आई रखुमाई…

कष्ट कष्टता जिंदगी रगताचे केले पाणी
पाहू दिली ना घराला त्यांनी कधी आणिबाणी…

झाल्या मनाला जखमा स्वत: फुंकर मारली
झाकली ती मुठ सदा खुली नाही कधी केली…

बाप पहाडा सारखा उभा राहिला पाठीशी
त्याने गोवऱ्या वेचल्या कधी राहिला उपाशी..

सोळा वर्षाचे वय गांधी बाबाला ऐकले
आणि स्वातंत्र्य यज्ञात त्याने स्वत:ला झोकले…

केले देशासाठी काम केले गावासाठी काम
झट झट तो झटला नाही मिळाला आराम …

बाप असतो आभाळ कधी समजत नाही
माय असते संगती त्यात भरते निळाई…

बाप असतो सागर त्यात भरावी घागर
कधी संपतच नाही सदा उधाण जागर…

नाही फिटत हो पांग आम्ही जन्म ऋणाईत
छत्रछाया ज्याच्या घरी नित्य बसा सावलीत….

प्रा. सुमती पवार

– रचना : प्रा.सौ.सुमती पवार
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६