Tuesday, February 24, 2026
Homeपर्यटनसुंदर कास पठार

सुंदर कास पठार

आज 18 एप्रिल, जागतिक वारसा स्थळ दिन. या निमित्ताने सुंदर कास पठार पाहू या.
– संपादक

युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत
महाराष्ट्रातील पुढील ७ स्थळांचा “महाराष्ट्रातील ७ आश्चर्ये” म्हणून समावेश केला आहे.
१) किल्ले रायगड (जिल्हा रायगड)
२) अजिंठा लेणी (जिल्हा औरंगाबाद)
३) कास पठार (जिल्हा सातारा)
४) लोणार सरोवर (जिल्हा बुलडाणा)
५) दौलताबाद चा किल्ला (जिल्हा औरंगाबाद)
६) छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई
७) ग्लोबल विपश्यना पॅगोडा, गोराई, मुंबई.

यापैकी २०१२ साली समावेश केलेले सातारा जिल्ह्यातील कास पठार, हे सातारा शहरापासून अवघ्या २२ किलोमीटरवर पश्चिमेला आहे. हे एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणुन विकसित झाले आहे.

कास हे जैव विविधतेचे आश्चर्यच आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात.

येथे २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती तसेच सुमारे ५९ प्रकारचे सरपटणारे प्राणी आढळतात.

कास पठार ला आपण अद्यापि भेट दिली नसल्यास एकदा तरी अवश्य भेट द्या.

विजय होकर्णे

– लेखन, छायाचित्रण : विजय होकर्णे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments