Tuesday, February 24, 2026
Homeसाहित्यपाहुणचार

पाहुणचार

भूतकाळ स्वागतात
होते का बाह्य प्रकार
गोड शिरा शिखरण
नसे कधीच तक्रार

पुरणाची पोळी होई
वेळ पाहूणे पाहून
पंचपक्वान्नाचा घाट
स्पर्धा भोजनी चाखून

आग्रहाने थाळीमध्ये
भोजनात वाढायचे
हात फिरवत पोटा
पचवत पचायचे

होई भोजन मजेत
विडा तांबुल खाऊन
कधी ऱंगावी मैफिल
राग भैरवी गाऊन

दीन दुबळ्याच्या घरी
स्वादा पिठले भाकरी
गोड काय बरे द्यावे
शिखरण होई त्वरी

ठेचा लोणचे चटणी
जमायची ती रंगत
कुरडई पापडाची
बसे मस्तशी पंगत

येई सीझन आंब्याचा
रायत्याची हो मिजास
आंबा वडी बांधायची
वाणोळ्यात देती खास

रानमेवा पिकलेला
आहे येथील प्रसिद्ध
थोडा बांधून न्याल न
आवडीने व्हावे सिद्ध

लाडू सातले बांधावे
लेक माहेरा येतसे
आजूबाजू चार घरी
आई प्रेम जपतसे

तूप घरात कढावे
बेरी वाटप करावी
चार ठिकाणी ताकास
सद्भावना ती जपावी

शेतामध्ये पिकायचे
वाटपात असे सर्व
मुखी प्रेम आनंदाने
देता मनी नसे गर्व

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments