सध्या कोहिमा आकाशवाणी केंद्राच्या वृत्त विभागात उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले श्री शाहू पाटोळे यांची बदली मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्तविभागात उपसंचालक पदावर झाली आहे. *अल्प परिचय* श्री पाटोळे यांनी १९९२ साली भारतीय माहिती सेवेत प्रवेश केला. या सेवेत त्यांनी आतापर्यंत पत्र सूचना कार्यालय नागपूर, नांदेड, अहमदाबाद, संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी, मुंबई, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, औरंगाबाद येथे काम केले आहे. त्यांनी पत्रकारितेची सुरुवात लातूरच्या राजधर्म दैनिकातून केली होती.त्यानंतर काही काळ ते भारतीय रेल्वेत होते. श्री पाटोळे यांची ओळख लेखक म्हणूनहीं आहे. त्यांचे “अन्न हे अपूर्ण ब्रह्म” हे पुस्तक विशेष गाजले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
शाहू पाटोळे सर आपले मुंबईत स्वागत आणि अभिनंदन