Friday, December 27, 2024
Homeबातम्याआरोग्य क्षेत्र : अभ्यासकांसाठी स्पर्धा

आरोग्य क्षेत्र : अभ्यासकांसाठी स्पर्धा

दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे सक्षमीकरण व शैक्षणिक संशोधनाला चालना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन आले असून या निमित्ताने TEER-25 (ट्रायबल एम्पॉवरमेंट अॅण्ड एज्युकेशनल रिसर्च) पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधकांनी आदिवासी आरोग्य सेवेवर लक्ष केंद्रित करणारे वैज्ञानिक शोधनिबंध स्पर्धेत सादर करावेत. तीर-25 करीता शोधनिबंध सादर करण्याची अंतीम मुदत दि. 20 डिसेंबर 2024 असणार आहे.

या विषयी अधिक माहिती देताना विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, दुर्गम भागात आदिवासी समुदायातील लोकांना आरोग्य विषयक अनेक समस्या आहेत. त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम व सुलभ करण्यासाठी तसेच त्या सुधारण्यासाठी चर्चा होणे गरजेचे आहे .म्हणून आरोग्य विद्यापीठ व अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिस्ट-25’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचवण्यासाठी जागतिक तज्ञांना एकत्र आणण्याचा ‘फिस्ट-25’ उद्देश आहे.
तीर-25 करीता निर्देशित केलेल्या विषयावरील शोधनिबंध शिक्षक, विद्यार्थी, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य व्यवसायिक सादर करु शकतील असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे प्रती-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, ट्रायबल एम्पॉवरमेंट अॅण्ड एज्युकेशनल रिसर्च म्हणजे ’तीर-25’ स्पर्धा हा अनोखा उपक्रम या परिसंवादाच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक संशोधकांनी ट्रायबल हेल्थ अॅण्ड डिसिज, हेल्थकेबर अॅसेस अॅण्ड युटीलायजेशन, ट्रॅडिशनल मेडिसिन अॅण्ड मॉडर्न हेल्थकेअर, ऑक्युपेशनल हेल्थ इन ट्रायबल्स, कर्ल्चरल सेन्सीटिव्हिटी, पॉलिसी इश्यु इन ट्रायबल हेल्थ या विषयावर शोधनिबंध सादर करावेत असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, सदर शोधनिबंधाच्या संक्षिप्त गोषवाऱ्याकरिता 300 शब्दांची मर्यादा असून शोधनिबंधाचा आकार, पोस्टर टेम्प्लेट आदी बाबत माहिती www.muhsfist25.com संकेतस्थळावर देण्यात आली आहे त्यानुसार शोधनिबंध सादर करावेत असे त्यांनी सांगितले.

याबाबत ‘फिस्ट’-25 चे सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले की, तीर-25 स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी स्पर्धेच्या नियम व अटींचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. दि. 20 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावेत. शोधनिबंध सादर केल्यानुसार सादरीकरण तसेच आवार्ड पेपर व पोस्टर सेशन करण्यात येईल. याचे तज्ज्ञ परीक्षण समितीकडून परिक्षण करण्यात येईल तरी जास्तीत जास्त संशोधकांनी तीर-25 करीता abstractmuhsfist@gmail.com ई-मेलवर शोध निबंध सादर करावेत.
ते पुढे म्हणाले की, नागपूर येथील ऑल इंडिया इंन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स आवारातील सभागृहात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या सहभागातून पहिला परिसंवाद होणार आहे. आरोग्य व तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधनाला नवी कलाटणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिसंवादातील ‘तीर’-25 स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी 07122752929 या क्रमांकावर संपर्क साधावा.

तीर-25 स्पर्धेकरीता मोठया संख्येने संशोधकांनी शोधनिबंध सादर करावेत असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९