“खऱ्या कलावंतांना जात वा धर्म नसतो” असे प्रतिपादन नांदेड येथील यशवंत महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत बोलताना गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. एम डी इंगोले यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नांदेड येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात यशवंत प्रबोधन व्याख्यानमाले अंतर्गत “आंबेडकरी जलसाकारांची सामाज प्रबोधनातील भूमिका” या विषयावर ते बोलत होते.
प्रा डॉ. इंगोले पुढे म्हणाले की, खऱ्या कलावंतांना कुठलीही जात नसते व धर्मही नसतो. तर कलावंत हीच त्यांची जात आणि कलेची उपासना हाच त्यांचा धर्म असतो. डॉ. एम डी इंगोले यांनी आंबेडकरी जलसाकारांनी लोक मनोरंजन आणि समाजप्रबोधनासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. आंबेडकरी आंदोलनासाठी जलसाकारांनी दिलेले योगदान आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रचार प्रसार कशा पद्धतीने केला यावरही त्यांनी प्रकाश टाकला. त्यात प्रामुख्याने शाहीर अर्जुन कदम, शाहीर कैलास राऊत, शाहीर बापूराव जमदाडे, शाहीर गौतम पानपट्टी, शाहीर क्रांतीकुमार पंडित, शाहीर आनंद कीर्तने, शाहीर ललकार बाबू, शाहीर विठ्ठल जोंधळे, शाहीर गौतम सरवदे, शाहीर गोपाळ इंगळे, शाहीर सुभाष गवळी इत्यादींच्या योगदानाचा समावेश होता.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर अर्थशास्त्रज्ञ व समाज सुधारक होते. त्यांचे कार्य व विचारांची प्रेरणा घेऊन आजचा युवक घडला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ कविता सोनकांबळे यांनी, सूत्रसंचालन डॉ. संदीप पाईकराव यांनी, तर आभार प्रा राज सोनटक्के यांनी मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी व्याख्यानमाला समितीचे सदस्य डॉ. गौतम दुथडे, डॉ. मीरा फड, डॉ ज्ञानेश्वर पुपलवाड, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. एस एस मावसकर डॉ. साईनाथ शाहू, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक पद्माराणी राव, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. कैलास इंगोले, डॉ. रत्नमाला मस्के, डॉ. प्रवीण निरकुटे डॉ. संजय ननवरे, डॉ. रमेश चील्हावार, डॉ. निलेश चव्हाण, डॉ. संभाजी वर्ताळे, डॉ. संजय जगताप, डॉ. अजय गव्हाणे, डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ. संदीप खानसोळे, डॉ. डी डी भोसले, डॉ. एस एम दुरानी, प्रा. भारती सुवर्णकार आदी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
खरा कलावंत हा जात धर्म यांच्यापलीकडे जाणारा मानवतावादी असतो हेच खरं.