दिवसामागून दिवस गेले,
बघता बघता वर्ष सरले.
कळेना मजला काय उरले,
काय सरले.
कधी टाळी सुखाची,
कधी टाळी दुःखाची
या टाळ्याच्या गजरात,
आयुष्य अर्धे विरून गेले
बघता बघता …..
काय उरले, काय सरले.
नव वर्षाच्या स्वागतासाठी,
आसमंत हे सज्ज जाहले
गोड गुलाबी थंडीने,
सार जग भिजून गेले.
बघता बघता ….
काय उरले, काय सरले
नवे संकल्प, नव्या उमेदी,
मनी बाळगुणी
रहाट गाडे तेच राहीले
सारं काही तिथेच राहीले
बघता बघता…वर्ष सरले
नव वर्ष दारी उभे ठाकले
नव वर्ष दारी उभे ठाकले
— रचना : सौ.शितल अहेर. खोपोली, रायगड
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
खूप छान कविता शितल जी⚘️👍