Wednesday, March 12, 2025
Homeपर्यटन"रमणीय व्हिएतनाम" : ४

“रमणीय व्हिएतनाम” : ४

दुपारच्या सत्रात आम्ही हेवन केव्हज कडे आलो. काहीजण लिफ्टने माथ्यावर गेले पण आम्ही मात्र भरल्या पोटावर पायथ्याच्या केव्हज मध्येच शिरलो. डोंगरातील उपयुक्त मार्बल काढून झाल्यावर तयार झालेल्या नैसर्गिक गुहेत ही हेवन केव्हज आहे.स्वर्गात किंवा नरकांत गेल्यावर काय होईल याचा आशय तिथे आम्हास पहायला मिळाला.

हेवन केव्हज भेटी नंतर वॉटर कोकोनट खाडीत बांबूच्या बुट्टीच्या आकारातील बोटीत व्हिएतनामी गोल शंकू आकारातील टोपी घालून मारलेल्या फेर फटक्याचा आनंद अवर्णनीय होता. आम्हां भारतीयांना बोटीतून नेताना नावड्यांची ‘बालत माता की जय’ अशी आरोळी ऐकतांना गंम्मत वाटायची. व्हिएतनाम गाण्याच्या तालावर बोटीत गिरक्या घेत केलेल्या कसरती लाजवाब होत्या.

काठावर परतल्यावर व्हिएतनाम गाण्याच्या तालावर आमचे ७७ वर्षीय हसतमुख जॉली मुंबईकर सहकारी रिचर्ड्स डिसोझा यांनी ताल धरला. मग आम्हीही सारे त्यांच्या सोबत मनसोक्त नाचलो.

होई अँन : सायंकाळी आम्ही होई अँन (Hoi An) या प्राचीन शहरांला भेट दिली. येथील बंदरात पूर्वी व्यापाराच्या दृष्टीने चीन व जपान देशातील लोकांनी केलेली वसाहत व बाजार पेठेस इलेक्ट्रिक कार ने रवाना झालोत. वसाहत व बाजार पेठ पहाताना जणू चीन, जपानला भेट दिल्याची अनुभूती मिळत होती. आजही तेथे चिनी, जपानी लोकांची नववी पिढी वास्तव्यास आहे. येथेच सायंकाळी सर्वांना खरेदीसाठी वेळ देण्यात आला होता. तिन्ही सांज होताच रंगी बेरंगी कंदील बोटीतून (Lantern boat) सफर करत नदीत सारेजण दिवे सोडतात. प्रत्येकांनी मनाचा संकल्प करून दिवे अर्पण केल्यास ती पुरी होते अशी आख्यायिका आहे.

बा ना हिल्स : दुसरा दिवस खास ‘बा ना हिल्स ‘ भेटीसाठी राखीव ठेवला होता.समुद्र सपाटीपासून १४८७ मीटर उंचीवर हे पर्यटन स्थळ आहे. सन वर्ल्ड बा ना हिल्सच्या आकर्षक कमानी समोर पर्यटकांची फोटोसाठी लगबग सुरु होती. मग धावत्या विद्युत जिन्याने आम्ही बरेच मजले वरती गेलो. नंतर डोंगर दऱ्या व किर्र जंगल आणि खळाळत्या पाण्याचे धबधबे बघत अर्ध्या तासात केबल कार प्रवासाचा रोमहर्षक अनुभव घेत हिल्स वर पोहोचलो. धुके, झोंबणारा वारा अन् पावसाची भुरभुर असली तरी आमचा उत्साह तसूभर कमी झाला नव्हता. फ्रेंच राजवट असताना त्यांनी हे स्थळ बनवले होते. पण आता हेच व्हिएतनाम पर्यटनाचे मुख्य आकर्षण बनले आहे. फ्रेंच कॉलनी, फॅन्टसी पार्क, मुन किंग्डम, लुनार कॅसल, टॉय ट्रेन, फाऊंटन, साहसी खेळ बघतानां आम्ही व्हिएतनाम मध्ये आहोत की युरोप मध्ये फिरतोय असा प्रश्न पडत होता. इथेच इच्छुकांना मोफत बिअर चा आस्वाद मिळतो.

परतीच्या प्रवासात केबल कार गोल्डन हँड ब्रीज जवळ थांबते. दोन अजस्त्र हाताच्या पंजात पाचशे मीटर लांबीचा सोनेरी ब्रीज अन् त्यावर स्वतःची व ग्रुपची छबी टिपण्यात सारे गुंग होतात. हलका पाऊस, दाट धुके अन् झोंबणारा वारा याची पर्वा न करता गोल्डन हँड ब्रीज वर भारताचा तिरंगा झेंडा फडकावत व जयघोष करत फोटो टिपत मिळणारा आनंद अमूल्य ठरतो. या रम्य आठवणी जपत आम्ही रात्री भारतीय हॉटेलवर जेवण उरकून विमानतळ गाठले. तेथून व्हिएतनाम एअर लाईन्स ने आम्ही राजधानी हनोई कडे रवाना झालो.
क्रमशः

— लेखन : संजय फडतरे. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित