तुझ्या नावाची चांदणवेल
अमृतात न्हाऊन निघते
तुझ्या सोबतीने सखया
माती अमृतानेच भिजते…….
कुणी लावलेय अंगणात
नक्षत्रांवाणी सांडे चांदण
एक एक तारा उजळतो
तुझं अहिवपणीच गोंदण…….
हिरवाईने स्वप्न पाहिलेलं
हिरवा हिरवा पिऊन रंग
तुझ्या सहवासात जडला
पानाफुलांनाही बघ संग………
निळ्याशार या डोहावरती
कोठून उमटतात तरंग
हळूच कुणी फुंकर मारता
वेडे मन रे होईल दंग……….
अशी अलवार चांदणवेल
तिला भेटलाय सायंतारा
तुझ्या माझ्या गगनास
शिवतोय खट्याळ वारा….

— रचना : सौ माधवी ढवळे. राजापूर, जि. रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800