Wednesday, August 6, 2025
Homeसाहित्यकाही भक्ती रचना

काही भक्ती रचना

१. नाथ महाराज

भागवत पंथ
संत एकनाथ
निवासी पैठण
दत्त भक्त -१-

केले तीर्थाटन
स्वामी जनार्दन
एकनाथ गुरू
गुरुसेवा -२-

भारूड, गौळण
जोगवा, अभंग
आनंद लहरी
भागवत -३-

हरी पंडित ने
नाथांच्या पादुका
त्या पंढरपुरा
वारी करी -४-

एका जनार्दन
जनता रंजन
केले प्रबोधन
जातीभेदा -५-

२. संत जनाई

मातंग समाजी
जन्म गंगाखेडी
प्रवृत्ती धार्मिक
स्वाभाविक -१-

जरी अशिक्षित
श्लोक नि अभंग
रचियेले श्रेष्ठ
ते उत्स्फूर्त -२-

दळता कांडता
रचियल्या ओव्या
सकल अभंग
संत गाथा -३-

अहंकार जाळा
करून अंगारा
वैष्णव म्हणून
तोच भला -४-

नामयाची दासी
विठ्ठल चरणी
पंढरी समाधी
जनाईची -५-

३. संत सावता

अरण ग्रामाचे
सावता सुपुत्र
प्रेमाचे आगर
सर्वां प्रती -१-

व्यवसाय शब्द
आले अभंगात
काशीबा गुरवे
लिपीबद्ध -२-

धर्म प्रबोधन
भक्तीचा प्रसार
केला मनोमन
सावताने -३-

मानव योनीत
घेई अवतार
संत लोकोत्तर
माळ्याघरी -४-

नकोत सायास
न काही संकट
नाम सोपी वाट
अनुभवे -५-

न गेले पंढरी
विठ्ठल अंतरी
जरी ते अभंग
सदतीस -६-

— रचना : बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on अनुवादित कथा
सौ. सुनीता फडणीस on श्रावण : काही कविता
सौ. सुनीता फडणीस on काही भक्ती रचना
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !
संदीप सुरेंद्र भुजबळ on देवश्रीच्या पत्रकारितेचा गौरव !