पंचगणी नगरपरिषदेच्या हिलदारी अभियानांतर्गत इको-फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ही स्पर्धा खुली असून, माझी वसुंधरा ६.० अंतर्गत पर्यावरण पूरक सण व उत्सव साजरे करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून, गणेशोत्सवाच्या पारंपरिक साजशृंगारात आधुनिक काळातील पर्यावरणीय भान जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. मूर्ती बनवताना माती, कागद, शाडू किंवा इतर जैवविघटनशील साहित्याचा वापर, सजावटीत पुनर्वापरयोग्य वस्तूंचा समावेश, ओला-सुका कचऱ्याचे व्यवस्थापन, नैसर्गिक सजावट, वृक्षारोपण, स्वच्छता उपक्रम आणि पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणुका यावर भर दिला जात आहे.

स्पर्धेचा तपशील :
🏠 घरगुती गणेशोत्सव स्पर्धा :
• प्रथम पारितोषिक – ₹5,001/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र
• द्वितीय पारितोषिक – ₹3,001/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र
• तृतीय पारितोषिक – ₹1,001/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र
• सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
🏢 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा :
• प्रथम पारितोषिक – ₹10,001/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र
• द्वितीय पारितोषिक – ₹7,001/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र
• तृतीय पारितोषिक – ₹5,001/- + सन्मानचिन्ह + प्रशस्तीपत्र
• सर्व सहभागी मंडळांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
📋 स्पर्धेचे मुख्य निकष :
1. मूर्ती व सजावटीसाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर
2. देखावा आणि सादरीकरणामध्ये पर्यावरण संवर्धन, स्वच्छता व शाश्वततेचा संदेश
3. आगमन व विसर्जनात पारंपरिक संगीत व वाद्यांचा वापर
4. ओला-सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र साठवण व्यवस्था
5. उत्सव काळात सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम (उदा. वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, सफाई कामगारांचा सन्मान, इ.)
6. प्रसाद वाटपासाठी प्लास्टिकच्या ऐवजी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर.
7. मंडळ परिसरात स्वच्छता व शिस्तबद्ध मांडणी.
8. मूर्तीचे पावित्र्य राखण्यावर भर.
📝 महत्त्वाची माहिती :
• अर्ज करण्याची अंतिम तारीख : २२ ऑगस्ट २०२५
• नोंदणी व अटींसाठी QR कोड स्कॅन करा (पोस्टरवर उपलब्ध)
• स्पर्धा मूल्यांकन निकष : पर्यावरणपूरकता, सामाजिक भान, स्वच्छता, सर्जनशीलता व उत्सवातील एकात्मता
• प्रवेश शुल्क नाही
📞 अधिक माहितीसाठी संपर्क साधा :
९८५००९८३०३ किंवा पंचगणी गिरीस्थान नगरपरिषद कार्यालय / हिलदारी कार्यालय
पंचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक श्री. पंडित पाटील यांनी सांगितले की, “सण उत्सव हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहेत. परंतु सण साजरे करताना पर्यावरणाचे भान राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हिलदारी अभियानाद्वारे आम्ही पंचगणीतील नागरिकांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेबाबत जनजागृती घडवण्याचे कार्य करत आहोत. गणेशोत्सव स्पर्धा हे त्याचेच एक प्रभावी पाऊल आहे.
🤝 सर्व पंचगणीकरांना सहभागी होण्यासाठी आवाहन :
ही स्पर्धा पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा आदर्श तयार करेल आणि भावी पिढ्यांसाठी शाश्वत शहर घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. पंचगणी नगरपरिषदेचे आणि हिलदारी टीमचे आवाहन आहे की, जास्तीत जास्त घरगुती गणेशभक्त आणि मंडळांनी यामध्ये भाग घ्यावा व पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्यावे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800