जपानच्या कावासाकी शहरात जागतिक जम्प रोप (दोरी उड्या) चॅम्पियन स्पर्धेत डोंबिवलीच्या तरुण खेळाडूंनी पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करून दाखविली आहे. 27 जुलै ते 3 ऑगस्ट 2025 या दरम्यान झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या टीमने दोन सुवर्ण आठ रौप्य आणि सहा कांस्य अशी एकूण 16 पदकांची कमाई केली असून त्यात बहुतेक खेळाडू हे डोंबिवलीकर आहेत, हे विशेष.

या जागतिक चॅम्पियन स्पर्धेत 36 देशातील 2600 खेळाडूंनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे याच खेळाडूंनी जुलै 2023 मध्ये अमेरिकेत झालेल्या जागतिक जम्प रोप चॅम्पियन स्पर्धेत आणि जुलै 2024 जपान मध्ये एशियन स्पर्धेत अशीच पदके मिळवली होती. कोणताही सरकारी निधी, खाजगी प्रायोजक न घेता, स्वत:च्या खर्चाने या टीमने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे पुढे अशीच कामगिरी करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. लोकप्रतिनिधी, सरकारी निधी व खाजगी प्रायोजक यांच्याकडून काही निधी मिळाल्यास या खेळासाठी अनेक नामवंत खेळाडू देशासाठी तयार होतील अशी अपेक्षा प्रशिक्षक अमन वर्मा यांनी व्यक्त केली आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800