नमस्कार मंडळी.
आपल्या पोर्टलच्या नियमित लेखिका, सिंगापूर स्थित नीला बर्वे यांच्या, आपल्या न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ने प्रकाशित केलेल्या “कोवळं ऊन” या पुस्तकाचे गेल्या आठवड्यात शानदारपणे प्रकाशन झाले. विशेष म्हणजे एक दोन नाही तर चक्क ४ पद्मश्री प्राप्त महान व्यक्तींच्या शुभेच्छा या पुस्तकास लाभल्या आहेत, या बद्दल लेखिका नीला बर्वे यांचे हार्दिक अभिनंदन.
आता गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचू या.
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)
“कोवळं ऊन” प्रकाशनाविषयी प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे आहेत…
१
कोवळं ऊन…चे दिमाखदार प्रकाशन वाचून खूप आनंद झाला. सध्या पुण्यात असल्याने या कार्यक्रमास येऊ शकले नाही याची खंत नेहमी राहील. अगदी ठरविले होते यायचे म्हणून पण राहीले. असो… खूप शुभेच्छा .
— स्वाती वर्तक. मुंबई
२
खरोखरच कोवळं ऊन प्रकाशन समारंभाची क्षणचित्रे छानच.
— राधिका भांडारकर. पुणे
३
सन्माननीय नीलाताई बर्वे यांचे पुस्तक “कोवळं ऊन” याचे प्रकाशन शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी संपन्न झाले.
कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि वातावरण अतिशय प्रसन्न होते. त्या दालनात पाय ठेवल्या ठेवल्या जो सुंदर अनुभव आला तो अवर्णनीय होता. ज्यां दालनात मध्ये मान्यवरांना चहा अल्पोपहारासाठी आमंत्रित केले, त्या दालनात पाय ठेवताच एक अद्भुत अनुभव आला. संपूर्ण दालन पु ल देशपांडे यांच्या छायाचित्रांनी भरलेले होते. अगदी लहानपणापासून तर मोठेपणापर्यंतची सर्व चित्र त्या दालनात होती. त्यांच्या अगदी छोट्या छोट्या आठवणी वस्तू त्या संग्रहालयात संग्रहित करून ठेवले होत्या. हे सगळं पाहून मन गदगद झाले. संपूर्ण वातावरण शेवटपर्यंत सकारात्मक होतं. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. 🙏 सन्माननीय मुकुंद चितळे सरांना पाहून मन भारावून गेले. पार्ले टिळकचे विश्वस्त आणि संपूर्ण भारताचे उत्कृष्ट सीए म्हणून ओळख असणारे सन्माननीय मुकुंद चितळे एक अद्भुत व्यक्तिमत्व आहे. 🙏
सन्माननीय नीलकंठ श्रीखंडे त्याचप्रमाणे सन्माननीय राजीव श्रीखंडे तसेच संपादक सन्माननीय सुकृत खांडेकर, अलकाताई भुजबळ, आणि त्यांचे यजमान, तसेच काव्यगुरु मा. विसुभाऊ बापट ही सर्व मंडळी पाहिल्यावर एक उत्तम संस्कृतीचा वारसा जाणवतो.
या सुंदर सोहळ्यामध्ये आपल्या शुभंकरोति साहित्य परिवारातर्फे सन्माननीय नीलाताई बर्वे यांना “शुभंकरोति साहित्यरत्न पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.
मा. स्वाती पोळ यांचे सूत्रसंचालन उत्कृष्ट झाले.
“कोवळं ऊन” हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. त्यातील गोष्टी अगदी थेट मनाला भिडून जातात. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या कथा अप्रतिम आहेत._
— मा. नीला ताई आपले हार्दिक अभिनंदन._
— अनामिक.
ज्येष्ठ नागरिक : राष्ट्रीय प्राधिकरणाची गरज…या विषयावर प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया….
१
भुजबळ साहेब, आपण २१ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना बद्दल आपल्या विशेष लेखामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनांची अजिबात माहिती नाही.कित्येक ज्येष्ठ नागरिकांनी तर अद्याप ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणारे ओळखपत्र देखील काढले नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक छळ होते. हे मात्र सत्य वस्तुस्थिती आहे. आई-वडिलांनी आपल्या मुलांना जन्म देऊन नेहमीच दोन हाताने त्यांना देण्याची भूमिका पार पडली आहे. परंतु आज अनेक आई-वडिलांना आपल्या मुलांसमोर आरोग्य विषयी हात पसरावे लागतात. हे ऐकून खूप वाईट वाटते. वास्तविक पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी २००७ मध्ये केलेल्या कायद्यामध्ये मुला मुलींची आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. ते टाळू शकत नाही. त्यांच्या मृत्यूनंतर संपत्तीला सर्वच वाटेकरी होतात. तेव्हा ते जिवंतपणे असताना देखील त्यांची सांभाळण्याची जबाबदारी आहे. आई-वडिलांनी तर आपल्या असलेल्या आई-वडिलांचे मृत्युपत्र बनवावे. जोपर्यंत आई-वडील आहेत तोपर्यंत मुलांना आई-वडिलांची संपत्ती मिळणार नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र ती संपत्ती मुलांचीच असेल. हे स्पष्ट आई-वडिलांनी आपल्या मुलांना आज सांगण्याची गरज आहे.
आपला लेख वाचल्यानंतर अनेक गोष्टी आठवतात. संघटनेमध्ये काम करताना अनेक मुलं आपल्या आई-वडिलांना सांभाळीत नाही. अशा अनेक घटना आज आपल्याला समाजात दिसतात. या विरुद्ध जनजागृती करणे आपल्यासारख्या लेखकांच्या हातात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष लेखाबद्दल आपले गोदी कामगारांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन.
— मारुती विश्वासराव. नवी मुंबई.
२
“जेष्ठ नागरिक प्राधिकरण स्थापन करावे” हा प्रस्ताव स्तुत्य आहे. धर्मवीर आनंद दिघे माहितीपूर्ण लेख.
— शोभा सुभेदार. ठाणे
३
💦 मा. देवेंद्र जी… 👍
जेष्ठ नागरिक.. यांचे साठी, फारच छान प्रस्ताव मांडला, माझी प्रतिक्रिया मी पोर्टल वर नोंदवली आहे.
धन्यवाद.. 🙏
— कवी सुभाष कासार. नवी मुंबई
अन्य प्रतिक्रिया…
१
कल्याण येथील रानभाज्यान्च्या प्रदर्शनाला यायला मिळाले असते तर ? असे वाटतेय. खूप नावीन्यपूर्ण पदार्थ, भाज्या, फळे.. त्यांचे पदार्थ पहायला मिळाले असते. बऱ्याच रान भाज्या दुर्मिळ आणि माहिती नसलेल्याही असतात. मजा आली असेल ना ?
स्वाती दामले यांची श्रावणमास ही कविता सुरेख आहे.👌🏻👍🏻
— सौ स्नेहा मुसरीफ. पुणे
२
या विद्यापीठांना कोण शिकवणार ? शिक्षणव्यवस्थेतील डोळ्यांत अंजन घालणारा अभ्यासपूर्ण लेख.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, हल्ली मुक्काम इंग्लंड.
३
श्री चकधर स्वामींचे विचार आज ही प्रेरक…मला तर वाटते आजच अधिक गरजेचे आहे. आपल्या समाजात इतक्या वर्षांपूर्वी संत, महात्मा, स्वामी झालेत. त्यांनी समानतेची शिकवणूक दिली पण उन्नत होण्यापेक्षा आम्ही अधोगतीला जात आहोत असे वाटते ..याचे कारण काय?स्वार्थासाठी खालच्या हीन पातळीवर जाणारा हा माणूस. दुर्दैव.. लेख छान आहे
डॉ पांढरीपांडे यांचा लेख विचारप्रवर्तक ..आपली क्षमता ओळखणे गरजेचेच आहे.. आई वडील म्हणतात. काही नाही.. सकारात्मक विचार करा पण त्यांना स्वतःलाही हे कळत नाही. सकारात्मक आणि तर्कसंगत यात फरक आहे.
राधिकाताईच्या आठवणी छान आहेत. प्रारूपतेने जरी जपले गेले तरी संस्कार, धर्म, श्रद्धा जपणे महत्वाचे …आम्ही भावंडांनी पिठोरीला आईची खूप आठवण केली ..अतिथी कोण..हे सर्व हृदयाच्या कुपीत जपून आहे अजूनही…
— स्वाती वर्तक. मुंबई
४
धर्मवीर आनंद दिघे … अतीसुंदर लेख.
— किशोर अहिरकर. नागपूर
५
“झेप”
डॉ विजय शिरीषकर ही प्रेरणादायक कथा आहे.
— प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे, हल्ली मुक्काम इंग्लंड.
६
नमस्कार सर.
मधुकर निलेगांवकर यांचे गणपतीला साकडे सुंदर.
मीरा जोशी यांचा ‘श्री क्षेत्र पद्मालय’ हा लेख आवडला. गणपतीची ‘साडेतीन पीठे’ आहेत हे प्रथमच समजले. कमळेही सप्तरंगी असतात हे सुद्धा प्रथमच समजले. चार रंगांची पाहिली आहेत.
— श्रद्धा जोशी. डोंबिवली
७
प्रकाश फासाटे यांची ’कृतार्थ’ कथा आत्ताच वाचली. ती कथा खूप भावली. साध्या शब्दात सुंदरपणे एका गाडी चालविणार्या चालकाचे आयुष प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोण काय बोलतात याकडे दुर्लक्ष करतात. संपूर्ण सेवा काळात विशेष काळजी घेणारे गाडी चालक न बोलता आपल्याला किती तरी शिकवून जातात.
— माधव गोगावले. शिकागो, अमेरिका
८
प्रकाश फासाटे यांची “कृतार्थ” ही कथा वास्तवदर्शी आहे. साधी घटना पण मनाला स्पर्शून जाते.
“कॅनव्हास आणि कविता” खूप छान शब्दांकन.
— शोभा सुभेदार. ठाणे
माझी जडणघडण ६३ अभिप्राय.
१
छान सण, कृतज्ञता, मुक्या प्राण्याच्या कष्ष्टाविषयी. छान सांगितले राधिकाताई तुम्ही.
— छाया मठकर. पुणे
२
अशा प्रकारचे हे सण आम्ही शहरात म्हणजे माझ्या बाबतीत पुण्यात आम्ही कधीच साजरे केले नाहीत..
फक्त त्या दिवशी बाजारात मातीची तयार केलेली बैलांची जोडी दिसायची.. पण तसा आमच्या कुटुंबाचा शेतीशी कधी संबंधच आला नाही.. त्यामुळे तुझा जडणघडणीतला भाग मला वाचायला खूप आवडला !! कृषीप्रधान भारतीय संस्कृतीतला हा अतिशय सुरेख असा सण आहे.. प्राण्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा..
आपल्या संस्कृतीमधील हे विविध पदर खरोखरच आपल्याला अचंबित करतात.. त्याचबरोबर आपण त्यापासून शहरात तरी खूप लांब जातो आहोत असे मला वाटते…
— सुचेता खेर. पुणे
३
छान ! हा खानदेश भागातील बैल पोळा..
पश्चिम महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला हा बैल पोळा साजरा होतो.. अशाच पध्दतीने !
वेळ वेगळी असली तरी महत्त्व आणि अर्थ तोच !
— उज्ज्वला सहस्त्रबुद्धे. पुणे
४
खूपच छान !
प्राणी, पशू, पक्षी, जल, आकाश, सूर्य, चंद्र, तारे हे सर्वच आपले भाऊबंध आहेत. हीच तर आपली संस्कृती आहे. आपले शरीर पंचमहाभुतांचे बनलेले आहे. प्रत्येकाच्या जडणघडणीत हे सण फार महत्वाचे आहेत हे नक्की !
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
५
प्रिय राधिकाताई,
बैलपोळाचे महत्त्व सांगून पटवून देणारा हा भाग अतिशय सुरेख.. तुमच्या तिथे पारंपारिक रित्या तो साजरा केला जातो हे सुद्धा खूप छान तुम्ही वर्णन केलं आहे..
प्रारूपतेने परंपरेचं लोण असं जपलं जातं हेच खरं…
खूप आवडला लेख.
— मानसी म्हसकर. वडोदरा
६
शेतकरी कुटुंबातील बैल पोळा या सणाचे महत्व त्याच बरोबर पिठोरी अमावस्या बद्दलची महती. माहेरी व सासरी अनुभवलेल्या ह्या सणाची माहिती व पोळ्यांची कथा सर्व काही सवविस्तरपणे वर्णन केले आहे खूप छान.
— श्रीकृष्ण भंडारकर. अमळनेर.
७
अमळनेरच्या आठवणी छानच
आहेत.
— सुमती पवार. नाशिक
८
बैलपोळा विषयी माहिती आवडली.
— रेखा राव. मुंबई
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
