ठिकठिकाणी गणेश उत्सव साजरा करण्यात आला. तसा तो आमच्या व्हिस्टा सोसायटीतही साजरा करण्यात आला. मी या सोसायटीत नवीन असल्याने, आपला सहभाग कसा असेल, बाकीचे आपल्याला कसा प्रतिसाद देतील याबद्दल मी साशंक होतो. पण मी या सोसायटीचाच एक अविभाज्य घटक आहे हेच मला पदोपदी जाणवत राहिलं. सर्व रहिवासी सुद्धा मला अगत्याने मान देत होते हे त्यांच्या मनाचं मोठेपण होय.
हा गणेशोत्सव अतिशय आनंदाने, भक्तीभावाने, एकोप्याने आणि परस्पर सहकार्याच्या भावनेने साजरा करण्यात आला.
पर्यावरणपूरक, शिस्तबद्ध पद्धतीने व भक्तीभावाने हा उत्सव पार पडला. त्यासाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री पडवळ साहेब, सचिव श्री हर्षल बहादरपूरकर, कोषाध्यक्ष श्री अतुल देसाई यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
उत्सवाचा प्रारंभ :
उत्सवाच्या तयारीसाठी सोसायटीतील सर्व मंडळी अग्रेसर होती. त्यात श्री अतुल देसाई, नितीन झा, हर्षल बहादरपूरकर, यश बेल्ले, आराध्य व अथर्व पळसकर, सुपे, आर्या देसाई हे अग्रेसर होते. इतरांनी सजावट आणि व्यवस्थापनासाठी विशेष योगदान दिले. मूर्तीचे बुकिंग, आगमन आणि वाहतुकीच्या प्रत्येक टप्प्यात या मंडळींनी सहकार्य करून हा उत्सव सुरळीत पार पडेल याची काळजी घेतली.
आरती आणि पूजा :
दररोज सकाळी 8.30 आणि संध्याकाळी 8 वाजता उत्साहाने आरती होत असे. सौ. निरुपा वैद्य, सौ. खुशबू सूर्यवंशी आणि सौ. रजनी बहादरपूरकर यांनी आरतीचे नियोजन आणि पूजेची तयारी मनापासून केली. आरती करण्याचा सपत्नीक मान अनेक जणांना मिळाला. मानाची आरती इंदिरानगर येथील माजी नगरसेवक श्री सुनील खोडे व सुप्रिया खोडे यांनी केलीश्री केशवराव वैद्य आणि सौ. आशाताई वैद्य यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना भक्तिभावाने केली, तर सत्यनारायण पूजा श्री अतुल देसाई आणि सौ. स्वाती देसाई यांनी मनोभावे पार पाडली. श्री अतुल देसाई, श्री देव व श्री शिरीष देसाई काका यांचेही योगदान मोलाचे ठरले. या सर्वांनी दहाही दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहून कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले
रांगोळी :
आकर्षक रांगोळी हे उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. अनेक भगिनींनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांनी उत्सवात रंगत आणली.

मुले : संस्कारांची फुले..
लहान मुलांसाठी चित्र कला, विविध खेळ, संस्कृतिक कार्यक्रम, संगीत खुर्ची, अंताक्षरी, गाण्याचा कार्यक्रम तबलावादन व बऱ्याच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यासाठी रेणु झा, श्रेया कुमार, मयुरा केळकर, शिवांगी काळे, रजनी बहादरपूरकर आणि खुशबू सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

ड्रॉइंग, क्विझ, ट्रेझर हंट, संगीत खुर्ची अशा कार्यक्रमांनी वातावरण आनंदाने आणि जोशाने भरून गेले.
तेजस्विनी वैद्य, अन्वेषा शिंदे, अवनी बहादरपूरकर आणि केतकी जोशी या बालकलाकारांनी सुंदर अँकरिंग करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. गणपतीवर आधारित नाटक लहान मुलांनी उत्कटतेने आणि कसलेल्या कलाकारांप्रमाणे सादर केले. यासाठी श्रेया कुमार आणि सौ. सुमन कुमार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात सर्व लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. त्यामुळे बच्चे कंपनीचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला.
मुलांना भेटवस्तू देण्यासाठी सौ. रजनी बहादरपूरकर व सौ. रुपल चौधरी व सौ. पल्लवी राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले
नासिक नगरीचे सुरेल गायक श्री दिलीप चोपडे व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पद्माकर चौधरी यांनी या कार्यक्रमात उत्कृष्ट गाणी म्हणून कार्यक्रमाची लज्जत वाढवली.
सर्वांनी रॅम्प वॉक सुद्धा केला रॅम्प वॉक करताना सर्वजण टाळ्यांच्या गजर करत होते.
जेष्ठ नागरिक : संस्कारांचा दीपस्तंभ
ज्येष्ठ नागरिकांनी अथर्वशीर्ष पठण करून कार्यक्रमाला अध्यात्मिक रंग दिला. या अथर्वशीर्ष पठणाच्या आयोजनात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पद्माकर चौधरी आणि सौ. रजनी चौधरी तसेच सौ इंदुमती ठाकरे, सौ पळसकर काकू यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
सर्वांच्या सहभागामुळे व सर्वांनी सक्रिय सहभाग घेतल्याने भारतीय परंपरा टिकून राहावी आणि पुढच्या पिढीला संस्कारांचा वारसा मिळावा यासाठी व्हिस्टा सोसायटीने एक आदर्श निर्माण केला त्याचे सर्व श्रेय हे श्री पद्माकर चौधरी व सौ रजनी चौधरी, श्री भामरे साहेब, श्री कदम साहेब, श्री राजपूत साहेब व श्री पांडे साहेब यांना जाते.
क्रीडा व इतर उपक्रम :
स्पोर्ट्स, ट्रेझर हंट आणि संगीत खुर्ची यांसारख्या कार्यक्रमांचे श्री नितीन झा, हर्षल बहादरपूरकर, मयुरा केळकर, शिवांगी काळे आणि सहकाऱ्यांनी सुयोग्य नियोजन केले. या उत्सवात रंगत आणण्यासाठी इतर भगिनींचे मोलाचे सहकार्य लाभले. महिलांसाठी आणि मुलांसाठी रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला. सर्वांनी त्यात हिरीरीने भाग घेऊन उत्साह आणि आनंद यांचा संगम साधून एक आदर्श निर्माण केला.
यासाठी सौ.रुपल चौधरी व सौ पल्लवी राजपूत यांनी मोलाचं सहकार्य केले
महाप्रसाद : एक अनुभूती
दररोज रात्री सुग्रास महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सर्वश्री राजेंद्र पांडे, पद्माकर चौधरी, अजित देसाई, रणजीत राजपूत, दिलीप चोपडे, भास्करराव कदम, विजय काळे काका, चंद्रकांत हलगे आणि इतरांनी जेवणाच्या बाबतीतील सर्व व्यवस्था सांभाळून सहकार्य केले. प्रत्येक दिवशी वेगवेगळा मेनू अतिशय लज्जतदार आकर्षक स्वादिष्ट पौष्टिक असावा यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले. सर्वानुमते जेवणाचा मेनू ठरविण्यात आला होता.
विशेष योगदान :
विशेष कौतुक केले पाहिजे ते सौ पांडे काकुंचे. त्या स्वतः आजारी असताना सुद्धा त्यांनी या गणेशउत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवला व महिलांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी स्वतःकडून दोन साड्या भेट दिल्या. त्यासाठी लकी ड्रॉ काढण्यात आले. त्या लकी ड्रॉ मध्ये सौ. जोशी आणि सौ. गायधनी यांना त्या मिळाल्या.
एकात्मतेचा संदेश : या उत्सवाच्या यशात श्री शरद पाटील (अध्यक्ष विस्टा सोसायटी) ; श्री रघुनाथ भामरे (सेक्रेटरी व्हिस्टा सोसायटी) ; श्री पद्माकर चौधरी (अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ) ; श्री भास्करराव कदम (ज्येष्ठ साहित्यिक) व श्री रणजीत सिंह राजपूत साहेब व श्री दिलीप चोपडे साहेब (खजिनदार व्हिस्टा सोसायटी) ; श्री राजेंद्र पांडे काका तसेच श्री अजित देसाई काका यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे.
त्यांच्याच सल्ल्याने आणि नेतृत्वाखाली सोसायटीतील प्रत्येक सदस्याने उत्सवात जोश पूर्ण सहभाग घेऊन भक्तिभावाने रंगत आणली. श्री छबु काळे (व्हिस्टा सोसायटी मॅनेजर) हाऊसकीपिंग आणि सुरक्षारक्षकांनी उत्कृष्ट व शिस्तबद्ध व्यवस्थापन करून कार्यक्रम यशस्वी केला.

श्री रघुनाथ भामरे साहेब यांनी या उत्सवातील सर्व उत्साही कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांना श्री रणजीत सिंह राजपूत साहेब यांनी मनापासून धन्यवाद दिले व आभार मानले
आदर्श सोसायटी :
व्हिस्टा सोसायटीचा गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नव्हता, तर संस्कार, पर्यावरण, समाजभान आणि एकोपा जपणारा प्रेरणादायी भावभक्तीने परिपूर्ण असा उपक्रम ठरला.
येथे प्रत्येक रहिवासी एक परिवार म्हणून एकत्र येतो, एकत्र नांदतो व परस्परांना सहकार्य करतो आणि पुढच्या पिढीला संस्कारांचा वारसा देतो. हे चित्र खूप आशादायी आहे “प्रथम सोसायटी, नंतर मी” हे ब्रीदवाक्य सोसायटीत प्रत्येकाच्या वर्तनात आणि कार्यात दिसते . आनंदाचा क्षण असो की दुःखाचा, प्रत्येक जण एकमेकांच्या सोबत असतोच. हेच या सोसायटीमधील वैशिष्ट्य आहे.
एकत्र कुटुंब पद्धती, ज्येष्ठांचा, महिलांचा, प्रत्येकाचा मान सन्मान जपणारी ही सोसायटी प्रत्येक रहिवाशांची मुगुटमणी ठरलेली आहे.
बाप्पाला निरोप देण्यासाठी बाप्पाची सगुण रूपातून निर्गुण रुपात जाण्याची वेळ आल्याने अकरा दिवसांचा गणपती बाप्पाचा लळा लागल्यानंतर श्री विसर्जनाच्या वेळेस विस्टा परिवारातील सर्व रहिवाशांना अश्रू अनावर झाले होते.
श्री विसर्जन मिरवणुकीत अर्जुन सूर्यवंशी यांनी अप्रतिम ढोल वाजवला तसेच आदित्य भणगे यांनी ताशा वाजवून या कार्यक्रमात रंगत आणली.
प्रत्येक रहिवाशाने मनापासून सहभाग घेत सोसायटीला एक कुटुंब म्हणून जपण्याचा संदेश दिला. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेत संस्कार, परंपरा आणि समाजबंध यांचा सुंदर मिलाफ साधला. यामुळे व्हिस्टा सोसायटी नाशिकमध्येच नव्हे तर महाराष्ट्रभर आदर्श ठरेल असा विश्वास वाटतो.
— लेखन : डॉ. चंद्रकांत हलगे. नाशिक
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800