१. हे रे पावसा
माझा माझा म्हणून तुजला
पायी तुडवला मानवाने
रागाचा त्या दणका का तू
दाखवावा या निमित्ताने
भरली शेती वाहून गेली
वाहून आसवं आटून गेली
विरून गेली स्वप्न फाटकी
गोधडीची ऊब कुठे मिळावी
संसार सारा उघडा पडला
पोरबाळं कशी सैरभैर
वीज पावसा थैमान बेफाम
भूक झाली अनावर
गुदमरला हा जीव निसर्गा
आवर आता कोप तुझा
आंधळा गर्व हा मानवाचा
माफ कर हा गुन्हा एकदाचा
— रचना : मोहना कारखानीस. सिंगापूर
२. जा रे जा पावसा
जा रे जा पावसा
नको अवेळी तुझा
धिंगाणा असा
किती करशील कहर
रात्र नी दिवस कळत नाही
वाया जातो आता
एक एक प्रहर
कधी आता जातोस
जीव लागला टांगणीला
बळीराजा माझा
यंदा ही फसला
पाणी पिण्यासाठी
कधी तरसतं होतो
नको नको वाटे पाणी
आता इतके देतो
पाणी दिले भरपूर पिण्यास
अशी कशी वाट चुकला
पिक गेले करपून
तोंडाचा घास रे हुकला
तुझ्या येण्याची वाट
बघून थकलो होतो
आला पाहुणा होऊन
मुक्काम जास्तीचा
नको नकोसा होतो
जा रे जा पावसा
नको अवेळी तुझा
धिंगाणा असा
— रचना : चंद्रशेखर कासार. धुळे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अतिशय सुरेख वर्णन मोहना जी. आजकालच्या पावसाच्या रूपाला अगदी साजेसे.
खूप छान वास्तव दर्शवणारी कविता मोहना ताई
अतिशय सुंदर कविता मोहना जी. अगदी या वेळेच्या पावसा मुळे होणाऱ्या कहराला समर्पक, अशी.
मोहना मॅम…खूपच वास्तव ह्हुद्य चित्र कवितेतून उभे केले आहे तुम्ही..🙏🙏
मोहना , तुझी कविता खूप सुंदर आहे.आत्ताच्या परिस्थितीचे वर्णन
परफेक्ट केल आहे.कवितेतील शेवटचे कडव फार भावले.
मनापासून धन्यवाद 🙏
मोहना तुझी “ हे रे पावसा” ही निसर्ग कोप झाल्यावर लिहिलेली कविता खूप आवडली.त्यातील “ वाहून आसवं आटून गेली “ ही ओळ मनाला चटका लावते. माणसाने अनेक वेळा निसर्गावर आक्रमण केले,शेवटी निसर्ग आपल्या महान शक्तीचा तडाखा देऊन माणसाचे गर्वहरण करतो आणि माणसाला त्याची माफी मागावी लागते . हे सर्व आपल्याला विचार करायला लावणारी ही कविता आहे.
मनापासून धन्यवाद 🙏
मोहनताईंनी लिहिलेली कविता आजकाल च्या परिस्थितीला अतिशय समर्पक आहे. खरा तर पाऊस हा हवा हवा सा वाटणारा, कवी मनाला भुलवणार.. परंतु हाच पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो, तेव्हा काय होते हे अगदी मोजक्या शब्दात मोहना ताईंनी मांडले आहे. निसर्ग समोर मनुष्याचा गर्व कसा क्षण भंगूर ठरतो हेही त्यात आपल्याला दिसून येते.
मनापासून धन्यवाद 🙏
अतिशय हृदय द्रावक आणि सत्याला आधारीत कविता आहे. खुपच छान
👏👏👏👏
मोहना ताई, तुझ्या कवितेतून आजच्या पावसाचा नाद, सुगंध आणि वातावरण जिवंत झालं. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं चित्र तू अगदी मनाला भिडेल अशा पद्धतीने रंगवलं आहेस
मनापासून धन्यवाद 🙏
मोहना कारखानीस, चंद्रशेखर कासार
दोन्ही कविता अत्यंत भावस्पर्शी आहेत; शब्दांच्या माध्यमातून समाजातील वेदना आणि हताशा यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे.
मनापासून धन्यवाद 🙏
मोहना खरेच वास्तवदर्शी कविता 👌🏻👌🏻
मनापासून धन्यवाद 🙏
मोहनाजी ‘ हे रे पावसा’ आणि चंद्रशेखरजी ‘जा रे जा पावसा’ आपणा या दोघांच्या कविता सद्य:स्थितीत नको नको झालेल्या पावसामुळे, मानव व मानवेतर परिसंस्थेवर झालेले विपरित परिणाम समर्पकपणे वर्णन करतात.. या प्रलयंकारी, विनाशकारी पावसाला उद्देशून ‘काढता पाय’ घेण्याचे आवाहन करतात.
मनापासून धन्यवाद 🙏
खरे पाहता ही सुंदर सृष्टी मानवासाठी ईश्वराने निर्माण केली कारण मानव तिला सांभाळेल, तिचे संगोपन करेल म्हणून ही जबाबदारी ईश्वराने मानवाला दिली कारण मानवच असा एक प्राणी आहे की तो सर्वांना सांभाळून घेऊ शकतो पण या निसर्गाकडून मानव फक्त ओरबाडण्याचे काम करत आहे त्याच्यावर अत्याचार करत आहे परिणामी याची शिक्षा आज मानव भोगत आहे. खूप छान वास्तव या कवितेतून सौ.मोहनाताई संजय कारखानीस यांनी केले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन
मनापासून धन्यवाद 🙏
मोहना तुझे कविता वाचली आवडली.
मनापासून धन्यवाद सतीशजी
मनापासून धन्यवाद 🙏
‘हे रे पावसा’ ही मोहना कारखानीस यांची कविता फार छान आहे. अतिवृष्टीमुळे होणारे बळीराजाचे नुकसान, उध्वस्त होणारा संसार यातून चित्रित होते.
धन्यवाद 🙏
धन्यवाद भरतजी🙏
खूपच छान आहेत दोन्ही कविता. यावर्षी आम्ही हेच अनुभवतो आहोत. आमच्या सर्वांच्या मनातील भावना व्यक्त झाल्या आहेत.
धन्यवाद
हो रे पावसा…ही मोहना कारखानीस यांची कविता भावली. मानवाचे निसर्गावर होणारे आक्रमण आणि त्यातून ढळणारा तोल याचे चित्रण कवितेत दिसते.
मोहना मॅडम आणि कासार सर, अती पावसाने केलेले नुकसान, त्याने उद्ध्वस्त झालेले जीवन या कवितांतून दिसून येते.
धन्यवाद 🙏
निसर्ग कोप या शिर्षकांतर्गत असलेल्या दोन्ही कविता खूप छान.
मोहना कारखानीस यांच्या हृदयभेदक कवितेचं शिर्षक मात्र अफलातून.
येरे येरे पावसा या सर्वज्ञ व सर्व प्रिय अशा शब्द रचनेला थोडासा छेद देऊन *हे रे पावसा* अशी शब्द रचना करण्याची कल्पना अप्रतिम.
धन्यवाद 🙏
मोहना आत्ताच मी निसर्ग कोप कविता वाचली छान वर्णन केले आहे कोपलेल्या निसर्गाचं,👌कासार साहेबांची सुद्धा कविता छान आहे 🌹🌹
धन्यवाद सुषमा
पावसाची वेगळी वेगळी रूपं मोहना आणि चंद्रशेखरजी यांनी कवितेतून साकारली आहेत ती खूप छान आहेत.
मनापासून धन्यवाद 🙏प्रतिभा
मोहना मॅडमची पावसाच्या प्रकोपावरची कविता हृदय आहे.
कासार सरांनीही छान कविता लिहिली आहे
मोहना मॅडमची पावसाच्या प्रकोपावरची कविता हृदय आहे.
कासार सरांनीही छान कविता लिहिली आहे.
Nisarg kop khup rudaysparshi aahe.
Shetkaryache dukhh dolyasamor ubhe zhale.
😭😭
परिस्थितीला अनुसरून पावसाला केलेले आर्जव
अप्रतिम.
खूपच छान शब्दात व्यथा मांडली ताई.
मनापासून धन्यवाद 🙏
मनापासून धन्यवाद 🙏मनिषा
मोहना कारखानीस यांच्या “हे रे पावसा” या कवितेवर माझा अभिप्राय असा आहे की, ही कविता निसर्गाच्या कोप आणि मानवी अहंकाराच्या परिणामांना अतिशय हृदयस्पर्शी रीतीने मांडते. पावसाच्या थैमानाने होणारी शेतीची हानी, कुटुंबांची उध्वस्तता आणि जीवाची तगमग यांचे वर्णन इतके जिवंत आहे की, ते वाचकाला थेट प्रभावित करते. कवितेतून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही प्रभावीपणे उमटतो.
सिंगापूर येथून राहूनही महाराष्ट्रातील पूरग्रस्त परिस्थितीवर इतक्या संवेदनशीलतेने कविता लिहिणे हे मोहना कारखानीस यांचे खूप कौतुकास्पद आहे. हे दाखवते की, मातृभूमीशी असलेली त्यांची भावनिक नाळ किती मजबूत आहे आणि परदेशात राहूनही त्यांची सहानुभूती आणि चिंता महाराष्ट्राच्या लोकांसाठी कायम आहे. अशा साहित्यिक योगदानामुळे सीमांच्या पलीकडेही एकता जपली जाते!
मनापासून धन्यवाद 🙏
मोहना आत्ताच मी निसर्ग कोप कविता वाचली….खूपच छान आहे …तसेच चंद्रशेखर कासार साहेबांची जा रे जा रे पावसा कविता पण वाचली…छान आहे
खूप सुंदर कविता. सध्याची पूरस्थिती, शेतकरी आणी सामान्य. माणसांचे होणारे हाल, याची जाणीव करून देणारे श, सगळेच खूप छान.