१. उदो ग अंबे गर्जूया
शैलपुत्री हैमवती
गौरवर्णी गिरिजाया
गौरी गिरिजा पार्वती
तपस्विनी आदिमाया
महाश्वेता रुपवती
शिवानंदा शिवभार्या
चंद्रधारी भगवती
तपाचारी शिवप्रिया
पूर्वी दक्षकन्या सती
पुनर्जन्मी गिरिकन्या
शुभांगिनी बुद्धीमती
वृषारुढा शांत-सौम्या
पद्म त्रिशुल हे हस्ती
हात जोडिले प्रणम्या
महामोह नाशवती
भक्ता वांछित द्याया
क्षेमदात्री दयावती
रत्नयुक्त तू ऐश्वर्या
नवरात्री पूजार्रती
भक्त जमले कराया….
उदो ग अंबे गर्जूया….
— रचना : विजया केळकर. नागपूर
२. अंबा माता (पंचाक्षरी)
हे अंबे माता
धाव तू आता
सिंहासनाव
बैसौनी येता
तू जय कारा
हे दैत्य सुरा
आरती झाली
घंटा वाजली
ज्योती उजळा
भक्ती सोहळा
मायेची छाया
भक्तीचा पाया
दुःख हरावे
सुख तू द्यावे
तू देवी अंबे
माॅं रूप दुर्गा
— रचना : सौ. शोभा आव्हाड. सिन्नर
३. निवेदन
निवेदन सांगतो माते, भक्ती वाढावी,
मन राहो नामात, चित्ती शांतता यावी,
तुझेच गायन करण्यासाठी, सूर सापडावा,
तुझा गजर करतांना, जीव तल्लीन व्हावा,
तुझ्या दर्शनाच्या ओढीने, शरीर चालावे,
जागृत स्थाने कितीतरी, तव दर्शन मज व्हावे,
विविध ठिकाणी निसर्ग नटला, मी हरखून जावे,
या यात्रांनी जीवन माझे, कृतार्थ ते व्हावे,
ओढ तुझी ही सतत राहुदे, संतोष मनात,
तव कृपा लाभो सगळ्यांना, अनेक पिढ्यात,
तू जननी, प्रेमाने घ्यावे, उचलून संकटी,
जन्मोजन्मी भक्त ठेवी मज, राही पाठीशी… !!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
धन्यवाद सर माझी कविता प्रकाशित केल्याबद्दल मनापासून आभार