भावनांचा उडे फवारा
निसटूनी हातचे सारे
माणसांच्या गर्दीतूनी या
रंग दिसे हा कोणता रे
मोजायचे अंदाज तेही
मोजमाप नाही कारे
आकाशात वाहते गंगा
मिणमिणती तेच तारे
माणसांच्या गर्दीतूनी या
रंग दिसे हा कोणता रे
तडफड ही जीवांची या
वेदनांचे घाव होणारे
अन् तुझ्या भोवताली
नसे कुणी सोसणारे
माणसांच्या गर्दीतूनी या
रंग दिसे हा कोणता रे
दुभंगलेल्या मना तुला
हाक ऐकू येईल नारे
येताच सावटास या
जा तुझे तूच सामोरे
माणसांच्या गर्दीतूनी या
रंग दिसे हा कोणता रे
हळहळ चहूदिशांतून
कानांवरती गर्जणारे
आतल्या कळी दाबून
शब्द मागे हे फिरणारे
माणसांच्या गर्दीतूनी या
रंग दिसे हा कोणता रे
भावनांचा उडे फवारा
निसटूनी हातचे सारे
माणसांच्या गर्दीतूनी या
रंग दिसे हा कोणता रे

— रचना : सौ माधवी प्रसाद ढवळे. राजापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800