निसर्गाच्या लयीनुसार जगायला शिकविणारी अशी हिंदू संस्कृती आहे. विविध धार्मिक, पौराणिक कथा, परंपरा, सण, यात्रा जितक्या हिंदू धर्मात आहेत, तितक्या अन्य कोणत्याही धर्मात नाहीत. आपले जीवन समृद्ध करणारे सण साजरे करताना, आपण पर्यावरणाला हानी तर पोहोचवित नाही ना ? याची आपण काळजी घेतली पाहिजे.
सणांचा राजा समजला जाणारा दिवाळी सण आज पासून सुरू होत आहे. जाणून घेऊ या, या वर्षीची दिवाळी कशी आहे !
आपणास व आपल्या परिवारास दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा🪔🏮🕯️

शुक्रवार, १७ ऑक्टोबर : “वसुबारस”
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो !

शनिवार, १८ ऑक्टोबर : “धनत्रयोदशी”
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

सोमवार, २० ऑक्टोबर : “नरकचतुर्दशी”
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो.

मंगळवार, २१ ऑक्टोबर : “लक्ष्मीपूजन”
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो. लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !

बुधवार, २२ ऑक्टोबर : “पाडवा अर्थात बलिप्रतिपदा”
पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा. थोरामोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो.

गुरुवार, २३ ऑक्टोबर : “भाऊबीज”
भावाबहिणीतील जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे !
ही दिवाळी साजरी करताना आपण समाजातील वंचित बंधू, भगिनींची, त्यांच्या मुलाबाळांची आठवण ठेवून त्यांचीही दिवाळी आनंदाने कशी साजरी होईल, यासाठी काही विचार, प्रयत्न करू या.
पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800