लेखक, लेखिका, कवयित्री, वाचक,मुद्रक, प्रसार माध्यमे अशा सर्वांच्या सहकार्याने न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स आगेकूच करीत आहे.
देशातील लेखक, लेखिका, कवयित्री यांची पुस्तके प्रकाशित करण्याबरोबरच परदेशातील लेखिकांची पुस्तके न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्सने यशस्वीरित्या प्रकाशित केली आहेत. केम्यान आईसलंड निवासी शिल्पा तगलपल्लेवार गंपावार यांच्या, “मी शिल्पा… चंद्रपूर ते केम्यान आईसलंड” या आत्मचरित्राचे लोकार्पण गेल्या वर्षी नागपुर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तर प्रकाशन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे, जेष्ठ चित्रपट लेखक, दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

तर सिंगापूर निवासी नीला बर्वे यांच्या “कोवळं ऊन” या कथा संग्रहाचे प्रकाशन यावर्षी गणपतीच्या मुहूर्तावर ज्ञानवृद्ध श्री एन. एन. श्रीखंडे यांच्याहस्ते, उद्योजक तथा व्यासंगी साहित्यिक श्री राजीव एन. श्रीखंडे, जेष्ठ पत्रकार डॉ सुकृत खांडेकर, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे,”कुटुंब रंगलय काव्यात” फेम प्रा विसुभाऊ बापट आदींच्या प्रमुख गणपतीच्या मुहूर्तावर मुंबई येथे संपन्न झाले. या पुस्तकास पद्मश्री, सर्वश्री प्रसाद सावकार, मधु मंगेश कर्णिक, शंकरबाबा पापळकर आणि उदय देशपांडे यांच्या मिळालेल्या शुभेच्छा म्हणजे एक विक्रमच म्हणावयास हवा.

विशेष म्हणजे, या दोन्ही लेखिका आपापल्या देशांत आणि आम्ही संपादक, प्रकाशक, पुस्तक मांडणीकार , मुद्रक आपल्या देशात… अशा दूरस्थ परिस्थितीतही ही पुस्तके केवळ बाह्यता आकर्षकरित्या आणि वाचनीयच ठरली नाहीत तर ती बिनचूकपणे प्रकाशित झाली आहेत. अर्थात या दोन्ही लेखिका आणि इतर सर्व संबंधितांचे अथक परिश्रम यामुळेच हे सर्व शक्य झाले आहे.
उपरोक्त सर्व कामगिरी बघून, न्यूज स्टोरी टुडे ला इंग्रजी पुस्तक प्रकाशनाचा काहीही पूर्वानुभव नसताना जेष्ठ चित्रपट लेखक, दिग्दर्शक श्री प्रदीप दीक्षित यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी अरुणा ठोसर दीक्षित यांनी इंग्रजीत लिहिलेल्या,
A Romance for Ruby
and two other plays
या नाटकाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशनाची जबाबदारी मोठ्या विश्वासाने न्यूज स्टोरी टुडे वर सोपविली.

खरे तर पुस्तकाच्या निर्मितीसाठी पुरेसा वेळ हाती नसताना देखील ग्रंथाली चे प्रमुख श्री सुदेश हिंगलासपुरकर आणि त्यांच्या टीमने हे शिवधनुष्य लीलया पेलले आणि पुस्तके वेळेत पुणे येथे पोहोचवली. पुस्तके पाहताच त्यांचा दर्जा, छपाई, अचूकपणा यामुळे दीक्षित सरांनी तात्काळ फोन करून व्यक्त केलेला आनंद म्हणजे एका ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाने दिलेला आशीर्वादाच होय. पुस्तक आवडल्यामुळे त्यांनी ही पुस्तके या नाटकाच्या 16 नोव्हेंबर 2025 रोजी बॉक्स थिएटर्स मध्ये झालेल्या प्रयोगाच्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली.

अशा प्रकारे न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशन्स ची वाटचाल सुरू आहे. या वाटचालीत आपला सहभाग स्वागतार्ह आहे. आपल्या कल्पना, सूचना असल्यास कृपया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
