वाटतात ते आपले तरी कुठे आपले ?
सभोवताली आपल्यांमधे नसे आपले..
कशी चालली जीवनगाडी विचारू नका
लोक आपले नाही तितके बरे आपले..
नाव घेतले नसे कदाचित वावरताना
तोंडावरती जरी दाखले दिले आपले..
बिनकामाचे काय बिनसले घोडे त्यांचे
शकुनाचे मग उगा फोडले खडे आपले..
नफा मिळे ना तोटा झाला तिळा तिळाचा
आपल्यावरी कशापायी जळे आपले..?

— रचना : दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
