Tuesday, November 18, 2025
Homeसाहित्यवाचक लिहितात…

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
वाचक लिहितात.. सदरात आपले स्वागत आहे.
वाचू या गेल्या आठवड्यात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया…
आपला स्नेहांकित
देवेंद्र भुजबळ (संपादक)

1
🌺 अभिनंदन पत्र 🌺
================
सौ. अलकाताई देवेंद्र भुजबळ — ‘रापा २०२५’ पुरस्कारप्राप्त
यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹
आदरणीय सौ. अलकाताई,
सप्रेम नमस्कार!🙏
या वर्षीच्या सुवर्णमहोत्सवी *‘रापा – २०२५’* सोहळ्यात घोषित झालेल्या ‘ *उत्कृष्ट पोर्टल निर्मात्या’* या मानाच्या सन्मानाने आमच्या अभिमानात मोठी भर पडली आहे. आपल्या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि समाजाभिमुख कार्याचे हे खऱ्या अर्थाने योग्य मूल्यांकन आहे.
आपल्या *‘न्यूज स्टोरी टुडे’* या वेबपोर्टलच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्षे सकारात्मकता, सत्य आणि संवेदनशील पत्रकारितेचे मूल्य जपून समाजासमोर ठेवले आहे. कोविड च्या कठीण काळात लोकांमध्ये भीती आणि संभ्रम असताना, समाजाला योग्य माहिती आणि धीर देण्यासाठी आपण हे पोर्टल धाडसाने सुरू केले, हे आपल्या जिद्दीचे आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीचे द्योतक आहे.

कला-संस्कृती, विज्ञान, आरोग्य, संघर्षातून उभ्या राहिलेल्या व्यक्तिमत्त्वांच्या कथा आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांचे संवेदनशील, सजग आणि तथ्यनिष्ठ वृत्तांकन केल्यामुळे आज हे पोर्टल विश्वासार्ह माध्यम म्हणून उभे राहिले आहे.

आपल्या या प्रवासात पती श्री. देवेंद्र भुजबळ यांचा मोलाचा सहभाग विशेष उल्लेखनीय आहे. त्यांचे संपादकीय कौशल्य, सातत्यपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणा आणि आधार यांच्या जोरावर हे पोर्टल आज या उंचीवर पोहोचले आहे. तसंच आपल्या मुलींचा निःस्वार्थ पाठिंबा आणि प्रत्येक टप्प्यावरची साथ—हेच आपल्या यशाचे खरे बळ आहे.

आपल्याला पूर्वीही मिळालेले ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ आणि ‘माणुसकीचा गौरव पुरस्कार’ हे आपले कार्य आणि मूल्यांची साक्ष देतात. तसेच श्री. देवेंद्र भुजबळ यांना मिळालेले अनेक सन्मान व पुरस्कार —
• उत्कृष्ट संपादक पुरस्कार
• एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राप्त चौथा सन्मान
• एकता सांस्कृतिक पुरस्कार
• माणुसकीचा गौरव पुरस्कार
• रोटरी इंटरनॅशनल क्लब व्यावसायिक नैपुण्य पुरस्कार
• माध्यम भूषण पुरस्कार
हे सर्व मिळून आपल्या दांपत्याच्या कार्याची भव्यता आणखी उजळून टाकतात.

विद्यार्थी, समाज आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी आपण प्रेरणास्थान आहात.
आपल्याला मिळालेला ‘उत्कृष्ट पोर्टल निर्मात्या’ हा सन्मान—
✔ समाजाचा आवाज जपण्याच्या आपल्या धैर्याचा
✔ सत्याला प्राधान्य देणाऱ्या तत्त्वनिष्ठेचा
✔ चिकाटीने उभारलेल्या पोर्टलच्या कष्टांचा
✔ आणि सकारात्मक पत्रकारितेच्या ध्यासाचा
अभिमानास्पद पुरावा आहे.

अलकाताई,
आपल्या परिश्रम, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा हा सन्मान आम्हा सर्वांना अभिमानाने भारून टाकतो. आपली आगामी वाटचाल अधिक उज्ज्वल, प्रभावी आणि समाजप्रबोधनाच्या मार्गावर अधिक तेजस्वी होवो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा !

आपणास आणि आपल्या संपूर्ण कार्यसंघास मनःपूर्वक मानाचा मुजरा !
आपण असेच प्रेरणादायी कार्य करत राहा आणि समाजाला उजाळा देत राहा, हीच प्रार्थना.
सस्नेह शुभेच्छांसह,
आपला एक वाचक
— डॉ. चंद्रकांत हलगे. नाशिक
2
न्यूज स्टोरी टुडेच्या सर्वोत्कृष्ट निर्मात्या सौ.अलकाताई देवेंद्र भुजबळ यांना ” *रापा* ” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे तसेच संपादक देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..
— सुधाकर तोरणे. निवृत्त माहिती संचालक, नाशिक.
3
उत्कृष्ट पोर्टल निर्मात्या म्हणून “रापा” हा बहुचर्चित, बहुमान्य पुरस्कार अलकाताईंना प्रदान करण्यात आला ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. अत्यंत मेहनतीने आणि तळमळीने अव्याहतपणे पोर्टलचं काम या भुजबळ पतीपत्नीने सुरू ठेवलं, त्यात विविधता, रसग्रहणता आणली, त्यामुळे या पुरस्काराबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आजपर्यंत तुम्हाला अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे, यापुढेही असेच सन्मान आपणा उभयतांस मिळत राहोत, हीच मनःपूर्वक सदिच्छा.👍💐💐💐
— वीणा गावडे. मुंबई
4
मॅडम आणि आपले मनःपूर्वक अभिनंदन सर ! 💐🙏
— वैशाली  देशमुख.
5
रापा ॲवार्ड मिळाल्याबद्दल आपण उभायतांचे हार्दिक अभिनंदन..! 💐
2006 या वर्षी आपल्या महासंचालनाच्या *“बेबी”* या *“राष्ट्रीय एकात्मता”* विषयावरील  जाहिरातीस रापाचा ॲवार्ड मिळाला आहे.
— विकास पाटील. निवृत्त संकलक,
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय .
6
Congratulations to Alka Bhujbal and Devendra Bhujbalji, for Prestigious Rapa awards very good second of both of you, highly appreciated.
— Suresh Gokani. Former Producer,
Doordarshan, Mumbai.
7
🌹 न्यूज स्टोरी टुडेच्या सर्वोत्कृष्ट निर्मात्या सौ.अलकाताई देवेंद्र भुजबळ यांना “रापा” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे तसेच संपादक देवेंद्रजींचे मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा..🙏
— अरविंद जक्कल, मुंबई
8
रापा.. बद्दल नवीन माहिती मिळाली, छान वाटले राधिका ताईंचा लेखांक ..
योग यावा लागतो …यावर अवलंबून आहे ..अगदी सत्य, माझ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस अस्मादिकांनी पण हाच अनुभव घेतलाय मी.
— स्वाती वर्तक. मुंबई
9
वाढत्या आत्महत्या : शिक्षणाचा काय उपयोग ?
हा विषय सध्या ज्वलंत झाला आहे, असे एकंदरीत वाटते. खरं म्हणजे कुणीही आले जीवन अश्याप्रकरे संपवू नये. पण परिस्थिती तशी निर्माण झाली की, माणूस कोणत्याही टोकाला जातो. जिथे विचार करण्याची क्षमता संपते, तेंव्हाच अशा घटना घडतात. तुमचा हा लेख त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे,जे अशा मनःस्थितीत असतात. हा लेख वाचून कुणी त्यातून धडा घेतला तर लेखाचे सार्थक झाल्यासारखे होईल, असे मला वाटते. दिवसेंदिवस हे प्रमाण खरोखरच वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. समस्या, कौटुंबिक वादविवाद, प्रेमप्रकरणे आणि त्यात मनासारखे नाही झाले तर टोकाचे निर्णय घेतले जातात. अनेक बाबतीत येणारे नैराश्य या व अशासारखे निर्णय समाजमनाला चटके लावून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा तर अगदी ज्वलंत झाला. दररोज कुठेना कुठे अशी घटना घडते. बळी जाणाऱ्या जातो, परंतु माझे कुटुंब उघड्यावर पडेल, कुटुंबातील बाकी सदस्यांची काय परिस्थिती होईल, याचा अश्यावेळी विचार केला जात नाही. या लेखातून अनेकांनी विचार करावा आणि मनावर काबू ठेऊन तसा निर्णय घेऊ नये, असे मलाही वाटते. हा लेख वाचून प्रेरणा घेतल्यास लेखाचे सार्थक होईल, तसे ते व्हावे, अशी अपेक्षा.
— शेषराव वानखडे. जेष्ठ पत्रकार
10
वाढत्या आत्महत्या हा लेख वाचला मी. एका गहन विषयावर लेख आवडला सर.
— परवीन कौसर. बंगलोर
11
सातार्‍याचा साद्या महाद्या फारच मस्त..नक्की करून पाहणार.
देवेंद्रजी आपला वाढत्या आत्महत्या ..हा लेख खरोखरच चिंतनीय आहे.
आत्महत्येमागे मानसिक कमकुवता हे एक कारण आहेच पण मूळात मानसिक शक्ती अशक्त असण्याची कारणे शोधली पाहिजेत. वाढत्या गरजा, स्पर्धा, यशस्वी होण्यासाठी निवडले जाणारे शॉर्टकट्स, चंगळवाद, भोगवाद आणि या सर्वातून होणारे अपेक्षाभंग अशी नानाविध कारणे यामागे असू शकतात. म्हणूनच मनाच्या कणखर जडणघडणीसाठी प्रशिक्षण जरुरीचे वाटते.
— राधिका भांडारकर. पुणे
12
आत्महत्या बद्दलच्या लेखातील आकडेवारी पाहून खूप वाईट वाटतं. हे सगळं किती भयाण आहे. रोज या गोष्टींवर बोललं जातं, प्रबोधन केलं जातं; पण मुळाशी पोचू नाही आपण फारसं काही करू शकत नाही. याला कुठेतरी आपलं सिस्टम कारणीभूत आहे असे मला वाटतं
– अर्चना पाटील. नवी मुंबई

माझी  जडणघडण : भाग ७२ अभिप्राय…..
1
मा. राधिका ताई,
आपला योग हा लेख वाचला.
पत्रिका जाणकार असल्यानें आपलें लेखन वाचताना ग्रह, तारे, मंगळ याचे तात्पर्यसंदर्भ मी जाणू शकलो.
श्री. वाघमोडे यांची सभ्यता मनाला स्पर्शून गेली. लेख वाचनीय आहे. ज्यांना अनुभव हवेत त्यांनी अवश्य वाचला पाहिजे.
— अरुण पुराणिक. पुणे
2
योग आल्याशिवाय लग्न जमत नाही हे मात्र खरे ! बरेचदा लग्नाच्या बाबतीत हा अनुभव येतो !
— उज्ज्वला सहस्रबुद्धे.
3
ज्योतिकाच्या लग्नाचा सोहळा पुन्हा एकदा अनुभवला. खूप छान !
पण सगळे योगच असतात ना !
— अरुणा मुल्हेरकर. अमेरिका
4
किती छान योगायोग. जोडा देखील एकमेकांना अनुरूप
— अस्मिता पंडीत. पालघर
5
छान वरसंशोधन. मनासारखा जावई, पार झालेले लग्न कार्य, व्वा व्वा छान लिहिले आहे, राधिकाताई. 👌
— छाया मठकर. पुणे
6
खरंच खूप छान योग..
मस्त सोहळा..
— सुमती पवार. नाशिक

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

गोविंद पाटील सर on बालदिन : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”