Saturday, November 22, 2025
Homeयशकथानुरूल हसन : पोलीस प्रशासनातील रोल मॉडेल

नुरूल हसन : पोलीस प्रशासनातील रोल मॉडेल

एआय तंत्रज्ञानाचा वापर काय क्रांती घडवू शकतो, हे भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी दाखवून दिले. त्यांनी हा दृष्टिकोण पुढे ठेऊन, ह्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि इतर ही विविध उपाययोजना करून जिल्हा पोलीस प्रशासनात बदल घडवून आणले. त्यामुळे तेथील पोलीस अत्यंत कार्यक्षम झाले असून, जनतेचाही  उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गुन्हेगारीत घट आणि योग्य समन्वयामुळे जनतेला पोलीस प्रशासन आपले वाटत आहे.

सुधारणा :
हसन यांनी केलेल्या महत्वाच्या सुधारणात एआय चॅट-बॉट (सायबर बॉट), गुन्हा सीध्द करण्याविषयीच्या कार्यवाहीत विशेष सुधारणा, सेवा (SEVA), इ-समाधान, आरोग्यम् ॲप आणि अशा अनेक सुधारणा फलद्रुप झाल्याने इतरही जिल्ह्यातील पोलीस विभागात त्या अमलात येत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्हा रोल मॉडेल म्हणून राज्यभर पुढे येत आहे. सुधारणांची संक्षिप्त माहिती वाचकांसाठी पुढे देत आहे.
एआय चाट-बॉट – ह्याला सायबर बॉट असेही म्हणतात. ह्याचा लाभ सायबर गुन्हेगारांपासून फसवणूक झालेल्या व्यक्तीला त्वरित न्याय मिळवून देण्यासाठी होत आहे. अशा गुन्हेगारांच्या तपासाला गती मिळत आहे. परिणामी अशा गुन्हेगारीला आळा बसत आहे. सोबतच सायबर साक्षरता निर्माण होऊन महिलांच्या सुरक्षेसाठी देखील त्याचा उपयोग होत आहे़.

कन्व्हीक्शन मॉनिटरिंग :
ह्या डिजिटल  सुविधेचा उपयोग गुन्ह्यांच्या तपासासाठी आणि गुन्हेगाराला अविलंब अटक करता यावी यासाठी पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांना होत आहे. गुन्हेगारांची माहिती, पूर्व इतिहास इत्यादी माहिती होऊन त्वरित दोष सिद्धी व्हायला लाभ होत आहे. यात डॅशबोर्डची सोय असल्याने संबंधितांना ही माहिती विनासायास मिळत आहे.

सेवा (SEVA) :
गुन्हे प्रकरणाचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी तद्वतच गुन्हेगाराचा बळी ठरलेल्या व्यक्तीला देखील पोलिसात सहज तक्रार नोंदविता यावी यासाठी याचा उपयोग होतो. तपास अधिकाऱ्यांनाही पुढील कारवाई करणे सुलभ होते. याशिवाय कार्यवाहीचा तपशील तक्रारकर्त्याला व्हाट्सॲपवर देण्याची सुविधाही याद्वारे उपलब्ध करण्यात आली आहे. ई-दरबारद्वारे दर आठवड्याला पोलीस अधीक्षकांव्दारे तक्रारीचे अवलोकन करण्यास आणि तपास अधिकाऱ्यांना योग्य सूचना देण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. या अंतर्गत होणाऱ्या बैठकीत संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे म्हणणे पोलीस अधीक्षक ऐकूण घेतात आणि कामकाजाची पुढील दिशा ठरवतात. त्यामुळे अधिनस्त अधिकाऱ्यांवर वचक राहून जबाबदारीची जाणीव आणि कार्यक्षमतेत वाढ होते.

ई-समाधान :
या अंतर्गत ही अधिकारी आणि कर्मचारी आपल्या अडीअडचणी मांडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळवू शकतात.
आरोग्यम् ॲप – ह्या ॲप्लिकेशन अंतर्गत पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या आरोग्यविषयक तक्रारी नोंदविल्या जातात. त्यांना आवश्यक सल्ला व उपचाराबाबत तज्‍ज्ञांचे सहाय्य उपलब्ध करून दिल्या जाते. आरोग्यविषयक तपशिलाचा अभिलेखही ठेवला जातो याशिवायही प्रतिबंधात्मक व्यवस्थापन, बीट माहिती देणारी प्रणाली, जीपीएस आधारित पेट्रोलिंग, माझा रस्ता माझी सुरक्षा इत्यादी ॲप्लीकेशन ही अमलात आणण्यात आले आहेत.

दिशा – महत्त्वकांशी युवक युवतींना यूपीएससी, एमपीएससी, आदि स्पर्धात्मक परीक्षा देता याव्यात ह्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोफत मार्गदर्शन करण्याच्या हेतूने दिशा उपक्रमांतर्गत यु-ट्युब आणि वेबसाईट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1000 युवकांची योग्य चाचणीद्वारे पोलीस अधीक्षकांनी निवड केली आहे. त्यांना स्वतः पोलीस अधीक्षक नुरुल हसन आणि इतर अधिकारी हे देखील गरजेनुसार मार्गदर्शन करतात.

ए आय आधारित केपीआय टूल :
ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे स्वयंचलित माहिती गोळा करणारी प्रणाली असून, त्याद्वारे वेगवेगळ्या पोलीस ठाणे अंतर्गत प्रकरणावर काय कारवाई सुरू आहे, तपास योग्य दिशेने होत आहे की अनावश्यक विलंब होत आहे याबाबतची माहिती घेणे शक्य झाले आहे. या अंतर्गत वेगवेगळ्या 42 मापदंडांचा उपयोग करून त्यावर गुणांकन करून पोलीस कार्यक्षमता तपासली जाते. गरज असेल तेथे संबंधितांना योग्य निर्देशही दिल्या जातात. ह्या मापदंडात त्या-त्या ठिकाणी गुन्ह्यात झालेली वाढ किंवा घट कितपत झाली, तपासाची गुणवत्ता, प्रलंबित प्रकरणे अगर निकाली प्रकरणे किती इ. प्रकारच्या मापदंडांचा समावेश आहे.

क्यू-आर कोड आधारित नार्कोटिक्स आणि वाळू माफिया प्रतीबंध अभियान :
या अभियाना अंतर्गत अमली पदार्थाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालणे, त्याच्या दुष्परिणामाबाबत युवकांना शिक्षित करणे, त्यांच्या आहारी गेलेल्यांचे पुनर्वसन करणे, त्या बरोबरच वाळू तस्करांवर कडक कार्यवाही करून त्याला प्रतिबंध घालणे, आदी उपाययोजनांचा समावेश आहे. वाळू तस्करांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीमुळे मोठ्या प्रमाणात चोरी झालेली वाळू जप्त करण्यात आली आहे. वर्षभरात अशा प्रकारे जिल्ह्यात गोळा करण्यात आलेल्या वाळूची किंमत रु.100 कोटी एवढी अनुमानित करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या वरील कामगिरीची राज्यभर प्रशंसा होत असून, भंडारा पोलिसांना राज्याचे पोलीस महानिर्देशक यांनी उत्कृष्ट चौकशीबाबत देण्यात येणारे पारितोषिक देऊन पुरस्कृत केले आहे. शिवाय एफएआयसीसी (Federation of Indian Chambers of Commerce) या विख्यात संस्थेद्वारे ही गौरविण्यात आले आहे. सायबर बॉट या उपक्रमाची दखल घेऊन स्कॉच फाउंडेशननेही प्रशस्तीपत्र दिले आहे.

प्रभाव तंत्रज्ञानाचा
ए आय टेक आणि इतर उपक्रमामुळे भंडारा पोलिसांना गुन्हेगारीला आळा घालण्यात यश प्राप्त झाले आहे. खुनाच्या घटना वर्षभरात 34 वरून 7 वर तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या घटना 19 वरून 14 वर आल्या आहेत. दरोडा, चोरी, लुटमार इ. गुन्ह्यातही घट झाली आहे. परिणामी वरील उपक्रम इतर जिल्ह्यातही राबविण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाधारित पोलीसिंगमध्ये भंडारा जिल्हा पायलट जिल्हा म्हणून सर्वत्र ओळखल्या जात आहे. भंडारा पोलिसांना विविध पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले असून, राज्यभर त्यांच्या कामगिरीची वाहवा होत आहे.

— शब्दांकन : रणजीत चंदेल.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dipti Bhadane on मायबाप
Sujata Yeole on मायबाप
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on “शिवाजी विद्यापीठ”
अरुणा मुल्हेरकर on वाचक लिहितात…
गोविंद पाटील सर on बालदिन : काही कविता…
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on “वाढत्या आत्महत्या : या “शिक्षणा”चा काय उपयोग ?”