खळी पडू दे मौनावरती
कळी झुलू दे वाऱ्यावरती..
चांदण्यांतली एक चांदणी
टिमटिमणारी गालावरती..
एक चोरटी खुदकन हसली
बघ कोणाच्या नावावरती..
झाला गोंधळ बिन शब्दांचा
हास्याच्या त्या वळणावरती..
उठता बसता साठवले ते
येऊ लागते ओठांवरती..

— रचना : दिपाली महेश वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800.

सुंदर
वाह खूपच छान…