Sunday, September 14, 2025
Homeकलाअयोध्या राम जन्मभूमी मंदिरासाठी हेमंत दंडवते यांची अदभुत कलाकारी...

अयोध्या राम जन्मभूमी मंदिरासाठी हेमंत दंडवते यांची अदभुत कलाकारी…

अहमदनगर येथील हेमंत दंडवते हे एक प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे सातत्याने विविध कला प्रयोग सुरू असतात. त्यामुळे कला क्षेत्रात त्यांचे नाव आदराने नाव घेतले जाते काच कलाकृतीतील नाविन्य व आकर्षकतेमुळे देश विदेशात त्यांचा लौकिक आहे.

हेमंत दंडवते सध्या अयोध्या राम मंदिर जन्मभुमी तीर्थक्षेत्रासाठी ग्लास म्युरल (द्विमितीय) प्रभु श्रीराम यांची छबी काचेच्या आरशाच्या तुकड्यांपासून (बिव्हेल पिसेस) पासुन साकारतायेत. या कलेत पूर्ण आकाराची व्यक्तीचित्रे साकारणे खूपच आव्हानात्मक व अवघड आहे.
सखोल अभ्यास करून आधी आराखडा,चित्र रेखाटन,फार्मा कटिंग,आरसा तुकडी कटिंग,चँम्फर पॉलिश,अ‍ॅसिड टेक्शचर,अल्ट्रा व्हायलेट लाईट विशिष्ट ग़्ल्युद्वारे पेस्टिंग केले जाते. हे काच म्युरल काम करताना खूपच विलक्षण अनुभव येत आहे, असे ते म्हणतात.प्रभु श्रीरामचंद्राच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न व विलोभनीय असे आहेत .

तसेच महिरप,स्तंभ यांनी म्युरल अजून सुंदर दिसतेय.हे दुर्मिळ काच म्युरल निश्चितच अयोध्या मंदिराची शोभा वाढवेल यात शंका नाही व ते साकारण्यात मी माझे भाग़्यच समजतो असे दंडवते म्हणाले. काच म्युरल १० फुट उंच × ८ फुट रुंद असेल,त्यावर प्रकाश प्रभावने सजावट केली जाईल.दंडवते यांच्यानावे लिम्का सह अन्य ६ प्रतिथयश विक्रम नोंदवल्या गेले आहेत.दंडवते यांच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा.

-देवश्री भुजबळ, 9004060405.

Devashri Bhujbal
Devashri Bhujbalhttp://www.newsstorytoday.com
Contact Me : +919004060405 Email me : Bhujbal.devashri@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा