नमस्कार मंडळी.
श्री चंद्रकांत बर्वे आता U tube वर ‘सत्तरीची सेल्फी’ हा कार्यक्रम घेऊन येत आहे.
हां ते तसे मेडिया पर्सन आहे. म्हणजे आकाशवाणी, दूरदर्शन या माध्यमात त्यांनी सुमारे ३५ वर्षे देशभर फिरत नोकरी केली. त्या दरम्यान अभिनय आणि लेखन या गोष्टींचे त्यांचे ट्रेनिंग झाले.
तर सांगायची गोष्ट म्हणजे ते बॉर्न लेखक किंवा या ॲक्टर नाही तर ते ट्रेन्ड लेखक आणि ॲक्टर आहेत. उत्कृष्ट कार्यक्रम करून अनेक राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत. अनेक पेपरसाठी लेख लिहिले आहेत.
त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट विनोदी साहित्यासाठी असलेला आचार्य अत्रे पुरस्कार त्यांना मिळाला आहे. दोन नाटके रंगमंचावर आली, एक सिनेमा लिहून दिग्दर्शित केला.
पण कोरोना काळात मात्र रेडिओ, टीव्हीवर कार्यक्रम करणे नाही, कुठे भाषण बाजी नाही, त्यामुळे रिकामे न बसता त्यांनी आपला फोकस फक्त लिखाणावर ठेवला आहे. त्यांचे अनेक लेख दै सामनाने छापले. दै नवशक्तीने सुमारे दोन वर्षे फ्लॅशबॅक ही लेखमाला छापली. दै प्रहार सध्या ‘सेल्फी’ ही लेखमाला दर रविवारी छापत आहे.
पण या सगळ्याला त्या माध्यमाच्या आणि संपादकीय अशा मर्यादा असतातच. श्री बर्वे यांनी त्या मर्यादातून बाहेर पडायचंय आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या पुढची पिढी इंग्लिशमध्ये वाचन पसंद करते. मराठी नाही हो ! हां, पण मराठी हास्यविनोद ते छान एन्जॉय करतात. याबद्दल ते युवा पिढीला दोष देत नाहीत. कारण ते स्वतः ‘मी’ मराठी पुस्तके वाचायचे, हिंदी पुस्तके नाही, हां पण हिंदी सिनेमे मात्र आवडीने पाह्यचे. तशीच या नव्या पिढीची नवी आवड आहे.
श्री बर्वे यांना बदलत्या परिस्थितीत वयाची सत्तरी जवळ आल्यावर त्यांना U tube या माध्यमाने मोहित केलं. आणि त्यांचा दावा आहे की या त्यांच्या एकेका कार्यक्रमातून ते सर्व वयोगटातील स्नेही मंडळींशी कनेक्ट होऊ शकतील. त्यांच्या वयाच्या लोकांना कधी कधी नोस्टाल्जिक वाटेल आणि तरुण पिढीला एकदम आचंबित व्हायला होईल. ते जे बोलतील ते सगळं त्यांच्या अनुभवाचे बोल असतील. खोटं बोलायला जी क्रिएटीविटी लागते ती त्यांच्यात नाही, असं ते म्हणतात.
आकाशवाणी, दूरदर्शनच्या पूर्वी त्यांनी बँकेत, AFMC मध्ये नोकरी केली. राज्यात, देशात ते भरपूर फिरले. दहा परदेशवारी केल्या. त्यामुळे त्यांची अनुभवाची शिदोरी मोठी झालेली आहे. त्यांच्या चुकांचं डबोलं देखील मोठं झालेलं आहे. त्या आता त्यांना मन मोकळं करण्यासाठी कबूल करणे देखील आवश्यक आहेच की !
कित्येकदा सत्त्य हे अद्भुत असतं त्यामुळे ते कोणाला खोटे वाटू शकेल पण तसे नाही. त्यांच्याकडे एकेका कार्यक्रमात ‘समथिंग न्यू टू ऑफर’ असे असणार आहे. यात कोणत्याही विषयाची मर्यादा नाही कारण कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाही, अगदी राजकारण सुद्धा. हां पण त्यांची कमीटमेंट कोणत्याही राजकीय पक्षाशी नाही, कोणत्याही जाती धर्माशी नाही. ती आहे फक्त त्यांच्या विवेकबुद्धीशी. त्यांना जे पटते तेच ते बोलणार किंवा ते जे बोलतील ते त्यांना पटतेय म्हणूनच बोलतील एवढं नक्की.
हां ते कदाचित त्यांना जाणवणारीं सर्व सत्ये बोलतीलच असं नाही कारण काही सत्त्ये न बोलणे सामाजिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. पण असत्त्याला मात्र त्यांच्याकडे थारा नाही. ते बोलतील ते सत्त्य आहे असे तुम्ही खुशाल समजू शकता. आणि हो ! त्यांची चूक जर कोणी दाखवून दिली तर ती ते स्वीकारून त्याप्रमाणे स्वतःला करेक्ट करतील, बदलू शकतील कारण त्यांच्यात अनावश्यक इगो नाही. तर आता चला, आज ९ जुलै पासून पाहू यात ‘सत्तरीची सेल्फी’.
ही सेल्फी पाहण्यासाठी आपण कृपया
https://youtu.be/hUNkTdWCEOQ (high light करा) या लिंकवर क्लिक करा.
श्री बर्वे यांना नवीन उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा💐
– देवेंद्र भुजबळ 9869484800.
बर्वे सरांची सत्तरावीची सेल्फी असावी,सत्तरीची नव्हे. माझ्या मुंबई दूरदर्शनच्या १९७७ ते २०१४ या३७ वर्षांच्या काळात जी प्रचंड उत्साही, मंडळी भेटली त्यात बर्वे सरांचा अव्वल नं.आहे.त्यांच्याकडे सदासर्वदा प्रसन्न भाव असल्याने भावनिक वय सदासर्वदा तरुण आहे. सर तुंम्हाला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा आणि शुभचिंतन.
All the best for Selfie of shri Chandrakant Barve.
Nice introduction of multitalented personality.
आदरणीय बर्वे सरांसारख्या विविधांगी अनुभवसमॄद्ध साहित्यिकाचे साहित्य वाचायला खूप आवडेल व त्यातून बरेच काही शिकता येईल व आनंद मिळवता येईल.